मेस्सीसाठी काय पण! पत्नीला घटस्फोट देण्यास तयार, नेपाळवरून थेट भारतात आला चाहता

फुटबॉलप्रेमी आपल्या स्टार फुटबॉल खेळाडूवर जीव ओवाळून टाकली. इतकी त्यांची क्रेझ असते. जगभरात असेन अनेक चाहते तुम्हाला पाहायला मिळतील. असाच एक चाहता नेपाळवरून भारतात आला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी रात्रभर रांगेत उभा होता.

मेस्सीसाठी काय पण! पत्नीला घटस्फोट देण्यास तयार, नेपाळवरून थेट भारतात आला चाहता
मेस्सीसाठी काय पण! पत्नीला घटस्फोट देण्यास तयार, नेपाळवरून थेट भारतात आला चाहता
Image Credit source: Getty Images
| Updated on: Dec 13, 2025 | 8:43 PM

लियोनल मेस्सी भारतात येणार या एका बातमीनेच लाखो फुटबॉलप्रेमींच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याला पाहण्यासाठी गाव खेड्यातून लोकांनी जिथे येईल तिथे गर्दी करण्यास सुरुवात केली. इतकं त्याच्या प्रति वेड चाहत्यांमध्ये आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत जेव्हा अर्जेंटिनाने जेतेपद मिळवलं तेव्हा भारतात जल्लोष केला गेला. यावरून मेस्सीबाबत किती क्रेझ आहे ते दिसून येते. फुटबॉल सुपर स्टार शनिवारी रात्री भारतात आला. कोलकात्यात त्याचा नियोजित कार्यक्रम होता. त्याची झलक पाहण्यासाठी लोकांनी हजारो रुपये मोजले होते. इतकंच काय रात्रभर रांगेत उभे होते. पण त्यांना त्याची झलक पाहायला मिळाली नाही आणि चाहत्यांचा संताप झाला. त्याच्या चाहत्यांना त्याला पाहण्याची संधी न मिळाल्याने मैदानात धुडगूस घातला. असाच एका वेड्या चाहत्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेस्सीला पाहण्यासाठी त्याचा चाहता नेपाळवरून आला आहे. त्याने आपल्या व्हायरल क्लिपमध्ये सांगितलं की, ” मी नेपाळहून मेस्सीला भेटण्यासाठी खूप दूर आलो आहे… मला माझ्या कुटुंबाचाही उल्लेख करायचा आहे, ज्यांनी मला इथे येण्याची परवानगी दिली आणि माझे स्वप्न साकार केले… मी मेस्सीला पाहण्यासाठी माझ्या पत्नीला घटस्फोटही देऊ शकतो. मी येथे कॉलेज सोडून मेस्सीला पाहण्यासाठी खूप दूर आलो आहे.” मेस्सीसोबत त्याचा संघमित्र आणि स्ट्रायकर लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा संघमित्र रॉड्रिगो डी पॉल देखील आले आहेत.

लियोनल मेस्सी 14 वर्षानंतर भारतात आला आहे. मेस्सी कोलकाता आणि हैदराबादनंतर 14 डिसेंबरला मुंबईत येणार आहे. दुपारी 3.30 वाजता ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये होणाऱ्या Padel GOAT कप सामन्यात लियोनल मेस्सी भाग घेईल. दुपारी 4 वाजता बॉलिवूड स्टार्सचा सेलिब्रिटी फुटबॉल सामना होईल. वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 5 वाजता एक विशेष कार्यक्रम असेल. यावेळी एक चॅरिटी फॅशन शो, 2022 च्या अर्जेंटिनाच्या विश्वचषकातील स्मृतिचिन्हांचा लिलाव केला जाईल. त्यानंतर लुईस सुआरेझ यांच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश संगीतमय संध्याकाळ यांचा समावेश असेल. या कार्यक्रमाला शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.