Lionel Messi VS Virat Kohli: लियोनल मेस्सी की विराट कोहली? वर्षाला सर्वाधिक पैसे कमवण्यात पुढे कोण?
भारतात कायम क्रिकेट आणि फुटबॉलची तुलना केली जाते. पण भारतात फुटबॉलपेक्षा क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय आहे. येथे खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. त्यामुळे त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येते. पण फुटबॉलपटूंची जागतिक पातळीवर क्रेझ आहे. कसं काय ते विराट कोहली आणि लियोनल मेस्सीच्या कमाईवरून समजून घ्या.

प्रत्येक खेळात स्टार खेळाडू असतो आणि त्याची क्रेझ त्या खेळाची आवड असलेल्या लोकांमध्ये असते. एखादा नामांकित खेळाडू एखाद्या ठिकाणी गेला आणि त्या खेळाबाबत लोकांना काहीच माहिती नसेल तर लोकं आजूबाजूला देखील फिरणार नाहीत. भारत हा क्रिकेटप्रेमी देश आहे. पण फुटबॉलच्या चाहत्यांची काही कमी नाही. लियोनल मेस्सी भारतात आल्यानंतर त्याची क्रेझ दिसून येते. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकं हजारो रुपये खर्च करत आहे. इतकंच काय तर फोटोसाठी 10 लाख रूपये मोजण्यासही मागे पुढे पाहात नाही. क्रिकेट स्टार विराट कोहली मेस्सीची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. असं असताना क्रिकेट आणि फुटबॉलचे चाहते एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. या माध्यमातून आपल्या आवडत्या खेळातील स्टारची वार्षिक कमाईवरून तुलना करत आहेत. लियोनल मेस्सी आणि विराट कोहलीचे चाहते आकड्यावरून तुलना करत आहे. खरं तर या चर्चांना काही अर्थ नाही पण तरी कोण किती कमवतो ते जाणून घ्या.
मेस्सी विराटची वार्षिक कमाई किती?
विराट कोहलीने नुकतंच कसोटी आणि टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता वनडे क्रिकेट खेळत असून बीसीसीआयचा ए+ ग्रेड असलेला खेळाडू आहे. त्याला बीसीसीआयकडून वर्षाल 7 ते 8 कोटी रुपये मिळतात. आयपीएलमधून 17 कोटी कमवतो. तर जाहिरातीतून 90 ते 100 कोटी मिळतात, असा अंदाज आहे. दुसरीकडे, अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीला इंटर मिलानमधून498 कोटी मिळतात. तर मेस्सी जाहिरातीतून 580 ते 620 कोटी कमवतो. म्हणजेच वर्षाला 1100 ते 1120 कोटी कमवतो. तुलना झाल्यास मेस्सी विराटपेक्षा अधिक म्हणजे 950-970 कोटी कमवतो.
प्रति जाहिरात किती मिळतात?
विराट कोहलीकडे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या जाहिराती आहे. प्रत्येक जाहिरातीतून त्याला वर्षाला 7.5 ते 10 कोटी मिळतात. मेस्सीचा प्रसिद्ध स्पोर्टवेअर कंपनी अॅडिडाससोबत आजीवन करार आहे. यासाठी त्याला वर्षाला 165 कोटी रुपेय मिळतात. तर मेस्सी इतर जाहिरातीतून वर्षाला 412-575 कोटी कमावतो. एका जाहिरातीसाठी मेस्सी 100 कोटी आकारतो. लियोनल मेस्सीला एका जाहिरीतीसाठी 90 ते 150 कोटी मिळतात. तर विराट कोहलीला 7.5 ते 10 मिळतात. यावरून दोघामध्ये 135 कोटींचं अंतर असल्याचं स्पष्ट दिसून येतं.
इंस्टाग्राम पोस्टमधून किती कमाई?
विराट कोहलीला इंस्टाग्रामवरील प्रति पोस्टसाठी जवळपास 12 कोटी मिळतात. जगातील इतर क्रिकेटपटूंच्या तुलनेत ही रक्कम सर्वाधिक आहे. दुसरीकडे, लियोनल मेस्सीला इंस्टाग्रामच्या एका पोस्टासाठी 21 ते 25 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे येथेही कमाईचा फरक 15 ते 25 कोटींचा आहे. त्यामुळे विराट कोहलीपेक्षा कमाईच्या बाबतीत मेस्सी वरचढ आहे. पण ही तुलना करणं काही योग्य नाही. कारण दोघेही आपआपल्या खेळात दिग्गज आहेत.
