Asian Games 2023 | Avinash Sable याने रचला इतिहास, 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये पटकावलं गोल्ड

Avinash Sable Clinch Gold Medal In Steeplechase Asian Games 2023 | मराठमोळ्या अविनाश साबळे याने एशियन गेम्स स्पर्धेत इतिहास रचलाय. अविनाश अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

Asian Games 2023 | Avinash Sable याने रचला इतिहास, 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये पटकावलं गोल्ड
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 1:14 AM

बिजींग | भारतासाठी चीनमधून आणखी एक गोड बातमी आली आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राने एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. बीडच्या मराठमोळ्या अविनाश साबळे यानी मैदान मारलंय. अविनाशने 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताचं एथलेटिक्समधील हे पहिलंवहिलं सुवर्ण पदक ठरलं आहे. अविनाशने केलेल्या या कामगिरीसाठी त्याचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे. अविनाशने जिंकलेल्या गोल्ड मेडलमुळे टीम इंडियाच्या खात्यात वाढ झाली आहे. भारताच्या खात्यातील गोल्ड मेडलचा आकडा हा 12 इतका झाला आहे.

एकमेवाद्वितीय साबळे

अविनाश साबळे याने एशियन गेम्समध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेज या प्रकारात गोल्ड मेडल जिंकून देणारा पहिला भारतीय हा बहुमान मिळवला आहे. अविनाशने अवघ्या 8.19.50 सेंकदात 3 हजार मीटर पार केलं. या दरम्यान अविनाशच्या आसपासही कुणी नव्हतं. अविनाशने एकतर्फी विजय मिळवला. अविनाशने याससह रेकॉर्डही ब्रेक केला.

अविनाशने मिळवलेलं सुवर्ण पदक हे हांगझोऊमधील पहिलं ट्रॅक आणि फिल्ड पदक ठरलं. अविनाशने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांमध्ये मोठं अंतर ठेवलं होतं. हे अंतर शेवटच्या 50 मीटरपर्यंत कायम राहिलं. अविनाशच्या जवळपासही कुणी नव्हतं. अविनाशने अखेरच्या क्षणी मागे वळून पाहिलं. अविनाशने आपल्या मागे कुणीच नसल्याचं पाहून विनिंग लाईन क्रॉस करताना एकच जल्लोष केला.

ऐतिहासिक क्षण

अविनाश साबळे याची पहिली प्रतिक्रिया

“मी काहीही झाले तरी सुवर्णपदकासाठी वचनबद्ध होतो.मी वेळेवर खूश नाही, पण जेव्हा मी स्क्रीन पाहिली आणि मला चांगली आघाडी मिळाली आहे, तेव्हा मी सावकाश होऊन पदक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला. मी वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्डसाठी जाऊ शकलो असतो. पण ते दुसऱ्या स्पर्धेसाठी राखून ठेवलंय. सुवर्णपदक जिंकून मी आनंदी आहे”, अशी प्रतिक्रिया अविनाशने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दिली.

भारताच्या खात्यात किती मेडल?

दरम्यान सर्वाधिक मेडलबाबत चीन अव्वल स्थानी आहे. चीनने आतापर्यंत एकूण 229 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 121 सुवर्ण, 71 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे दक्षिण कोरिया (121) आणि जपान (106) आहे. तर भारत 43 मेडलसह चौथ्या क्रमांकावर आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.