भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी
महिला कुस्तीपटू भाग्यश्री फंड हीला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारी हीला धोबीपछाड देत पुरस्कारावर नाव कोरलं आहे. भाग्यश्री फंड हीला मानची गदा आणि महाराष्ट्र केसरी किताब मिळाला आहे.

पुण्याची भाग्यश्री फंड महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली. कोल्हापूरची अमृता पुजारी आणि पुण्याची भाग्यश्री फंड यांच्यात अंतिम सामना झाला.देवळीच्या रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. हा सामना भाग्यश्रीने 2-4 ने जिंकला. महिला कुस्तीपटूला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब 2024 -2025 मिळाला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती यांनी या स्पर्धला उपस्थिती लावली होती. ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघच्या मान्यतेने सुरु होती. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केले होते स्पर्धेचे आयोजन केलं होतं. भाग्यश्री फंडने या विजयानंतर आई वडील आणि प्रशिक्षकांचे आभार मानले.
स्पर्धा जिंकल्यानंतर भाग्यश्री फंडने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ‘या विजयासाठी मी सर्वांचे आभाव व्यक्त करते. या विजयात मला आई वडील आणि पतीने साथ दिली. माझ्या कुटुंबाच्या सहकार्याशिवाय इथपर्यंत पोहोचणं कठीण होतं. कारण कुस्तीपटूंचे कष्ट त्यांना माहिती आहेत. हरणाऱ्यानेही या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली असते. त्यांनी पुढच्या वेळेस प्रयत्न करावा.’ असं भाग्यश्री फंड हीने सामन्यानंतर सांगितलं.
‘महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन अतिशय सुंदर केलं होतं. असं आयोजन दरवर्षी करावं. या स्पर्धा जशा वाढतील तसा मुलींचा सहभागही वाढेल.’ असं भाग्यश्री फंड हीने सांगितलं. इतकंच काय सरकारने खेळाडूंना जितकी शक्य होईल तितकी आर्थिक मदत करावी, कारण प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगली नसते, असंही भाग्यश्री फंड हीने पुढे सांगितलं.
