FIFA World Cup 2026: कोण आहे जोनाथन डेविड? 96 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत कॅनडला केलं विजयी

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत यजमान कॅनडा सामना कतारशी झाला. या सामन्यात कॅनडाने विजय मिळवत इतिहास रचला. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो जोनाथन डेविड...

FIFA World Cup 2026: कोण आहे जोनाथन डेविड? 96 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत कॅनडला केलं विजयी
FIFA World Cup 2026: कोण आहे जोनाथन डेविड? 96 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत कॅनडला केलं विजयी
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 19, 2026 | 9:33 PM

Canada vs Qatar, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळणावर जाताना दिसत आहे. ग्रुप बी मध्ये यजमान कॅनडाचा सामना कतारशी झाला. या सामन्यात यजमान कॅनडाने फुटबॉल जगताला आश्चर्याचा धक्का दिला. कॅनडाने कतारला 6-0 ने पराभूत केलं. या जबरदस्त कामगिरीसह कॅनडाने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. कॅनडाच्या या विजयासह फुटबॉल वर्ल्डकप इतिहासात पुन्हा एकदा विक्रमाची पुनरावृत्ती केली. कॅनडा जगातील सहा गोल मारणारा दुसरा यजमान देश ठरला आहे.या विजयाचा शिल्पकार ठरला तरो स्टार फॉरवर्ड जोनाथन डेविड.. त्याने कतारच्या डिफेन्स पूर्णपणे उद्ध्वस्त केला. तसेच गोलची हॅटट्रीक नोंदवली.

96 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 96 वर्षांपूर्वी म्हणजेच 1978 साली झालेल्या स्पर्धेचं यजमानपद अर्जेंटिनाकडे होतं. या सामन्यात अर्जेंटिनाचा सामना पेरू या देशाशी झाला होता. तेव्हा अर्जेंटिनाने पेरूचा 6-0 ने पराभव केला होता. आता या विक्रमाची पुनरावृत्ती यजमान कॅनडाने केली आहे. दुसरीकडे जोनाथन डेविड फिफा वर्ल्डकप स्पर्धेत गोलची हॅटट्रीक करणारा पहिला कॅनेडियन फुटबॉलपटू ठरला आहे. युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल संघाव्यतिरिक्त वर्ल्डकपमध्ये हॅटट्रीक मारणारा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी 1930 मध्ये अमेरिकेच्या बर्ट पाटेनॉडने अशी कामगिरी केली होती.

कॅनडासाठी 16 व्या मिनिटाला पहिला गोल साईल लॅरिनने मारला. त्यानंतर 29व्या मिनिटाला, त्यानंतर पहिल्या हाफच्या इंजरी टाईमध्ये डेविडने गोल मारला. 64 व्या मिनिटाला नाथन सालिबाने चौथा गोल, 75व्या मिनिटाला कतारच्या मोहम्मद मणी स्वगोल केला. त्यामुळे 5-0 अशी स्थिती झाली. तर सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये डेविडने पुन्हा गोल मारत हॅटट्रीक नोंदवली आणि कतारचा 6-0 ने पराभव केला.

कोण आहे जोनाथन डेविड?

कॅनडाचा फुटबॉलपटू जोनाथन डेविड सध्या चर्चेत आहे. त्याचा जन्म न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये झाला होता. त्याचे आई वडील हैती येथे राहात होते. डेविड सहा वर्षांचा असताना कुटुंब कॅनडाच्या ओटावात येऊन राहिलं. त्याने अमेरिकेऐवजी युरोपमध्ये धडे गिरवले. बेल्जियम क्लब जेंटमधून सुरूवात केली. त्यानंतर 2020 मध्ये 30 दसलक्ष युरो शुल्कावर फ्रेंच क्लब लिलेमध्ये सहभागी झाला. पीएसजीसारख्या स्टार संघाला पराभूत केलं आणि लिलेला ऐतिहासिक लीग 1 चं विजेतेपद मिळवून दिलं. फ्रान्समधील प्रभावी कामगिरीनंतर इटालियन दिग्गज क्लब जुव्हेंटसने जुलै 2025 मध्ये त्याला विनामूल्य हस्तांतरणावर करारबद्ध केले.

Follow Us