Paralympics 2020: ऑलिम्पिकमधील उत्तम कामगिरीनंतर आता लक्ष्य पॅरालिम्पिक्स, भारताचं पहिलं दल टोक्योकडे रवाना

भारताने रिओ पॅरालिम्पिक्स, 2016 मध्ये 2 सुवर्णपदकांसह एकूण 4 पदकं खिशात घातली होती. यंदाही भारताचे खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये उत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

Paralympics 2020: ऑलिम्पिकमधील उत्तम कामगिरीनंतर आता लक्ष्य पॅरालिम्पिक्स, भारताचं पहिलं दल टोक्योकडे रवाना
भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक्ससाठी रवाना
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 7:23 PM

Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली. त्यानंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही अशीच कामगिरी करुन जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. 24 ऑगस्टपासून टोक्योमध्येच पॅरालिम्पिक्स खेळांना (Tokyo Paralympics 2020) सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय पॅरा-एथलीट्सचा संघ बुधवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळीच टोक्योसाठी रवाना झाला आहे. रवाना झालेल्या 8 खेळाडूंमध्ये रिओ 2016 पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्णपदक विजेता एथलीट मरियप्पन थंगावेलुही आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हे सर्व खेळाडू टोक्योसाठी रवाना झाले असून यावेळी  क्रिडा मंत्रालय, भारतीय खेल प्राधिकरण आणि भारतीय पॅरालिम्पिक समितिचे अधिकारीही उपस्थित होते.

थंगावेलु हा पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला भारतीय संघाचा ध्वजवाहक असेल. दरम्यान भालाफेकपटू टेक चंद आणि थाळीफेकपटू विनोद मलिक हेही टोक्योला रवाना होणार असून बुधवारी सायंकाळी दुसरे दल टोक्योसाठी रवाना होईल. यामध्ये भारतीय पॅरालिम्पिक समितिचे (PCI) अध्यक्षांसह 14 भारतीय असतील. रिओ पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेला भालाफेकपटू देवेंद्र झाझड़ियाही यांच्यासोबतच टोक्योला रवाना होईल.

25 ऑगस्टपासून सुरु होणार भारताच्या स्पर्धा

पॅरालिम्पिकमध्ये 25 ऑगस्टपासून भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा सुरु होतील. दरम्यान खेळाडू टोक्योला रवाना होताना माजी पॅरा-एथलीट आणि PCI ची अध्यक्ष दीपा मलिक म्हणाली की, संपूर्ण देश, माननीय पंतप्रधान, क्रिडामंत्री सर्वांनाच तुमचा अभिमान असून स्पर्धेआधीच तुम्ही सर्व विजेते आहात. मी स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा देते.”

पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?

पॅरालिम्पिक्स ही देखील आंतरराष्ट्रीय अनेक खेळ खेळवण्यात येणारी क्रिडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकप्रमाणेच खेळ असतात. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. फक्त या ठिकाणी खेळणारे खेळाडू हे अपंगत्व असलेले असतात. ज्यात एखादा शरीराचा भाग नसणे, स्नायूंची कमतरता, पायाच्या लांबीत फरक, अत्यंत कमी उंची अशा अनेक प्रकारच्या शाररिक बाधा असणारे खेळाडू सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (IPC) या खेळांचे आयोजन केले जाते.

इतर बातम्या

Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द पाळला, पीव्ही सिंधूला विजयानंतर दिलेलं Promise पूर्ण

टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार

(Indian Para athletes departed for Tokyo Paralympics 2020)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.