Tokyo Olympics : साजन प्रकाशचं घवघवीत यश, ऑलम्पिकसाठी पात्र होणारा पहिला भारतीय जलतरणपटू, वाचा कशी मिळाली पात्रता

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 29, 2021 | 7:27 PM

भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशने दुखापतींवर मात करत हे यश मिळवलं आहे. आता टोक्यो ऑलम्पिकचं तिकिटतर मिळालं असल्याने तिथे साजन कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Tokyo Olympics : साजन प्रकाशचं घवघवीत यश, ऑलम्पिकसाठी पात्र होणारा पहिला भारतीय जलतरणपटू, वाचा कशी मिळाली पात्रता
जलतरणपटू साजन प्रकाश
Follow us

रोम : भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशने (Sajan Prakash) रोममधल्या सेट्ट कोली स्विमिंग स्पर्धेत (Sette Colli Trophy) घवघवीत यश संपादन करत इतिहास रचला आहे. साजन ऑलम्पिक स्पर्धेसाठी पात्र होणारा पहिला भारतीय जलतरणपटू (Indian Swimmer) ठरला आहे. त्यामुळे साजन लवकरच टोक्यो ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympics) खेळताना दिसणार आहे. साजनच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Indian Swimmer Sajan Prakash Creates History Becomes First Indian Swimmer to enter in Olympic A Cut)

साजनने यश मिळवलेल्या रोममधील सेट्ट कोली स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाचे जलतरणपटू सहभाग घेत असतात.  या स्पर्धेतील पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात साजनने 1 मिनिट 56.38 सेकंदांत अप्रतिम कामगिरी पार पाडली. तर पात्रतेसाठी 1 मिनिट 56.48 सेकंद वेळ निश्चित करण्यात आली होती. साजनने 10 सेंकदाच्या फरकाने यश मिळवत ऑलिम्पिकचं तिकीटं मिळवलं आहे.

5 लाखांचे रोख बक्षीस

साजनच्या या यशानंतर केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी त्याच अभिनंदन केलं आहे. भारतीय जलतरणपटू महासंघाने (Swimming Federation of India) साजन ऑलम्पिकसाठी पात्र झाल्याने त्याचे अभिनंदन केले. मात्र ऑलम्पिकसाठी पात्र झालेला साजन पहिलाच भारतीय जलतरणपटू असल्याने त्याला बक्षीस म्हणून रोख 5 लाख रूपयांनी पुरस्कृत केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा :

Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी

Tokyo Olympics पूर्वी भारताला झटका, सर्वोत्कृष्ट धावपटूला दुखापत

(Indian Swimmer Sajan Prakash Creates History Becomes First Indian Swimmer to enter in Olympic A Cut)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI