AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paris Olympics 2024: Manu Bhaker ची ऐतिहासिक कामगिरी, भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलंवहिलं पदक

Manu Bhaker Bronze Medal: महिला नेमबाज मनु भाकर हीने इतिहास रचला आहे. मनुने भारताला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे.

Paris Olympics 2024: Manu Bhaker ची ऐतिहासिक कामगिरी, भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलंवहिलं पदक
women shooter manu bhaker win bronze medal
| Updated on: Jul 28, 2024 | 5:33 PM
Share

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी सर्वात मोठी आणि या क्षणाची आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाचं खातं उघडलं आहे. महिला नेमबाज मनु भाकर हीने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे. मनुने यासह इतिहास रचला आहे. मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. मनुने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवलं. मनुला रौप्य पदकाची संधी होती, मात्र ती थोडक्यात हुकल्याने तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. मात्र त्यानंतरही भारताला पहिलं पदक मिळाल्याने आनंदाचं वातावरण आहे. मनु भाकर हीने 2020 मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमधून पदार्पण केलं होतं. मात्र तेव्हा मनु अपयशी ठरली होती. मनुला तेव्हा 12 व्या स्थानी समाधान मानावं लागल्याने तिचं आव्हान संपुष्टात आलं. मात्र तिने जोरदार कमबॅक करत आता पदक मिळवलंय.

कोरियाच्या खात्यात सुवर्ण आणि रौप्य

मनु भाकरला रौप्य पदक मिळवण्याची संधी होती, मात्र ती थोडक्यात हुकली परिणामी पदकाचा रंग बदलला. या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कोरियाच्या ओह ये जिन हीने सुवर्ण पदक मिळवलं. तर कोरियाच्या की ही किम येजी हीने रौप्य पदक पटकावलं. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाळी. दोघींच्या पॉइंट्समध्ये फक्त 2चा फरक होता. कोरियाच्या या दोघींनी अुनुक्रमे 243.2 आणि 241.3 असा स्कोअर केला. टोक्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनुच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मनुला फक्त 14 शॉट लावता आले. परिणामी मनु फायनलसाठी पात्र ठरली नाही. मात्र मनुने अथक प्रयत्नांनी तिने कांस्य पदक मिळवलंय.

पहिली भारतीय महिला नेमबाज

दरम्यान ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी राज्यवर्धन राठोडने रौप्य (2004) आणि अभिनव बिंद्रा याने (2008) मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर गगन नारंग आणि विजय कुमार या दोघांनी 2012 मध्ये सिलव्हर मेडल मिळवलं होतं. तर आता मनु भाकर या नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळवणारी एकूण पाचवी भारतीय आणि पहिली महिला ठरली आहे.

मनु भाकरचा कांस्य पदकावर निशाणा

मनु शनिवारी फायनलमध्ये

मनुने शनिवारी 27 जुलैला 580 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहत अंतिम फेरीत धडक दिली होती. एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीसाठी एकूण 8 नेमबाजच पात्र ठरणार होते. त्यासाठी प्रत्येक नेमबाजाला 6 सीरिज खेळायच्या होत्या. मनूने या 6 सीरिजमध्ये 97,97,98, 98,96 आणि 96 असे एकूण 580 पॉइंट्स मिळवले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.