KHO KHO World Cup : भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, श्रीलंकेला नमवलं

भारताने श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरी गाठली आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. साखळी फेरीतील चार पैकी चार सामने भारताने जिंकले होते. तर उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेला पराभवाची पाणी पाजलं.

KHO KHO World Cup : भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, श्रीलंकेला नमवलं
| Updated on: Jan 17, 2025 | 9:43 PM

भारताने खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंका नमवलं. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम डिफेंस करण्याचा प्रयत्न केला. भारताला पहिल्यांदा अटॅक करण्याची संधी मिळाली. भारताला काहीही करून जास्तीत जास्त गुण मिळवणं भाग होतं. भारताने पहिल्या डावात अटॅक करत 58 गुणांची कमाई. तर दुसऱ्या डावात डिफेंस करताना 16 गुण गमावले. त्यामुळे दुसऱ्या डावाअखेर भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुणांचा फरक 42 वर आला होता. त्यामुळे तिसऱ्या डावात मोठी आघाडी घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तिसऱ्या डावात जास्तीत जास्त खेळाडू बाद करण्याचं आव्हान होतं. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात भारताला एकही ड्रीम गुण मिळवता आला नाही. खरं भारतीय पुरुष संघात ही उणीव दिसून आली आहे. तिसऱ्या डावात भारताने अटॅक करत 100 गुण मिळवले. तर श्रीलंकेच्या पारड्यात फक्त 18 गुण होते. भारताकडे 82 गुणांची आघाडी होती. चौथ्या डावात श्रीलंकेने 22 गुण मिळवले आणि 40 गुण झाले. भारताने हा सामना 100-40 ने जिंकला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध असणार आहे.

या सामन्यात बेस्ट अटॅकसाठी टीम इंडियाच्या सुब्रमणि व्ही याला पुरस्कार देण्यात आला. डिफेंडर म्हणून श्रीलंकेच्या ससिंदु थासारामल याला पुरस्कार दिला. तर सामनावीराचा पुरस्कार हा भारताच्या रामजी कश्यप याला मिळाला. त्याने या सामन्यात 16 गुण मिळवले होते.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत : प्रतीक वायकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.

श्रीलंका: मालवानलागे कुमारा, विक्रमाताची लकमल, बालकृष्णन सगेधन, सारप्पुलिगे थिसारामल, लेच्चामन सिरिदरन, हेत्तीराच्चिगे जयशन, मरासिंघगे चंद्रसिरी, रनहोटी कुमारथुंगा, मुथुनायकलागे हेमंथा, कालू प्रेमाजयंके, कालू प्रेमाजयंकुस, मनुनायकलगे हेमंथा धनंजया, रथथिरंगे मरासिंग, समरापुलिगे थिसरमल