AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kho Kho World Cup : पुरुष भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये, अतितटीच्या सामन्यात विजय

खो खो वर्ल्डकप 2025 स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेवर निसटता विजय मिळवला आहे. भारताला उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने चांगलंच झुंजवलं. दुसऱ्या डावापर्यंत कोण सामना जिंकेल याची धाकधूक लागून होती.

Kho Kho World Cup : पुरुष भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये, अतितटीच्या सामन्यात विजय
| Updated on: Jan 18, 2025 | 9:52 PM
Share

खो खो वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय मेन्स संघाने वुमन्स संघानंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी चांगलंच झुंजावं लागलं. भारताने दुसऱ्या डावात 8 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे तिसऱ्या डावात भारताला काहीही करून चांगला डिफेंस करणं भाग होतं. पण दक्षिण अफ्रिकन संघाने हा फरक कमी केला आणि गुणांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम अटॅक करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात अटॅक करत 18 गुणांची कमाई केली. दुसरीकडे डिफेंस करताना भारताला चांगलंच झुंजवलं आणि दोन ड्रीम रन गुण मिळवले.  पण भारताने चांगला अटॅक केला आणि 28 गुणांची कमाई केली. त्यामुळे दुसऱ्या डावाअखेर भारताकडे 8 गुणांची आघाडी होती.  पण दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या डावात कमबॅक करत ही आघाडी मोडून काढली. दक्षिण अफ्रिकेने 42-28 अंतर ठेवलं.  तसेच भारताला विजयाचा अंतर कापण्यासाठी 14 धावांची आघाडी मिळाली.  भारताला हा सामना जिंकायचा तर 16 गुण मिळवणं भाग होतं. तसेच ड्रीम रन मिळणार नाही याची काळजी घ्यायची होती.  भारताने 60-42 ने हा सामना जिंकला. भारतीय संघ 18 गुणांनी दक्षिण अफ्रिकेवर वरचढ ठरला आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत : प्रतीक वायकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.

दक्षिण आफ्रिका: मालिबोन्ग्वे त्यत्येका, बेंजामिन गोईत्सेमोदिमो, तेबुगो मोकुमी, थाटो मोटलांग, म्दुदुझी जेफरी, डोनाल्ड मोसिना, लेथलहोगोनोलो स्टॉर्क, न्हालालवेन्हले खोझा, गॉर्डन सिबिया, झोलिसिल आफाने, सिफो एमजीकोबो, ॲलेक्स फिरी, ली बोथ्सोनी, जोबोनी, लीबी, जोबोनी

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.