AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2026: मी नसलो तरी, आता…! कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने केलं मोठं विधान

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यं 5 गोल्ड, 12 सिल्व्हर आणि 6 कांस्य अशी 23 पदकं मिळवली आहेत. भारत नवव्या दिवसानंतर पदकतालिकेत दहाव्या स्थानी आहे. खरं तर क्रमवारीत अजून वरचं स्थान असतं. पण 12 स्पर्धकांना सिल्व्हर पदकावर समाधान मानावं लागलं. त्यात नीरज चोप्राकडून अपेक्षा होत्या मात्र त्यालाही सिल्व्हर पदकापर्यंत मजल मारता आली.

CWG 2026: मी नसलो तरी, आता...! कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने केलं मोठं विधान
CWG 2026: मी नसलो तरी, आता...! कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने केलं मोठं विधान Image Credit source: PM Modi Twitter
| Updated on: Aug 01, 2026 | 2:53 PM
Share

ग्लासगो येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत 23 पदकांची कमाई केली असून शेवटच्या दोन दिवसात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीपासून भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. त्याने अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली आणि सिल्व्हर पदक पटकावलं. विशेष म्हणजे अंतिम फेरीत भारताच्या तीन खेळाडूंनी जागा मिळावली होती. त्यापैकी नीरज चोप्राने सिल्व्हर आणि यशवीर सिंगने कांस्य पदक पटकावलं. तर रोहित यादवनेही पदकासाठी चांगला प्रयत्न केला. पण पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या इतिहासात गोल्ड आणि सिल्व्हर पदक मिळवणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे. या कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने आपलं मत व्यक्त केलं आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला की…

भालाफेकपटू नीरज चोप्रा सिल्व्हर पदक पटकल्यावनंतर म्हणाला की, ‘आज आशियाई खेळाच्या आठवणी ताज्या झाल्या, तेव्हा मी आणि किशोर कुमार जेना याने पदक जिंकलं होतं. मला आनंद आहे की, यशवीरने मोक्याच्या क्षणी आपला वैयक्तिक बेस्ट थ्रो केला. एकत्र पोडियमवर उभे राहणे ही एक अद्भुत भावना आहे. मी सुद्धा या हंगामात माझी सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि माझे पुनरागमन योग्य दिशेने वाटचाल करत आहे, पुढे अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. सर्वात मोठा आनंद हा आहे की, जरी मी मैदानावर नसलो किंवा जखमी असलो तरी, आपल्याकडे अजूनही चांगले भालाफेकपटू आहेत. यशवीरने आता 85 मीटर क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि रोहितही चांगली कामगिरी करत आहे. देशात भालाफेकीमध्ये इतकी प्रतिभा उदयास येत आहे हे पाहून खूप आनंद होतो.’

बेस्ट थ्रो करण्यापासून चुकलो, पण…

ग्लासगोमधील कामगिरीनंतर नीरज चोप्रा म्हणाला की, ‘आजच्या स्पर्धेत माझा फक्त एकच थ्रो चांगला झाला. बाकीचे थ्रो अधिक चांगले होऊ शकले असते. पण मला थंड वातावरणाता चांगली कामगिरी करणं अवघड जातं. मला उबदार हवामान अधिक पसंत आहे.’ नीरज चोप्राने सहा प्रयत्नांपैकी दुसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. पहिला थ्रो 80.97 मीटर, दुसरा थ्रो 85.83 मीटर, तिसरा थ्रो 81.29 मीटर आणि चौथा थ्रो 80.73 मीटर इतका लांब होता. तर पाचवा आणि सहावा थ्रो फाउल ठरला. नीरज चोप्रा आता 2026 मध्ये होणाऱ्या आगामी आशियाई खेळांपूर्वी डायमंड लीगमध्ये सहभागी होताना दिसू शकतो.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल