AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paris 2024 Olympics: पी व्ही सिंधूला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिकची संधी, गोल्ड मिळवणार?

P V Sindhu Paris Olympics 2024: पी व्ही सिंधूनी गेल्या 2 ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदकं जिंकली आहेत, त्यात रौप्य आणि कांस्य पदकाचा समावेश आहे. त्यामुळे यंदा सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून हॅटट्रिक पूर्ण करावी, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

Paris 2024 Olympics: पी व्ही सिंधूला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिकची संधी, गोल्ड मिळवणार?
P V SindhuImage Credit source: PTI
| Updated on: Jul 21, 2024 | 6:31 PM
Share

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेसाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंसह भारतीय चाहतेही सज्ज आहेत. यंदा भारताचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत अधिकाअधिक पदकं मिळवून देतील, अशी आशा आहे. त्यात बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हीच्याकडून भारताला सुवर्ण पदकाची आशा आहे, त्याचं कारणही तसंच आहे. पी व्ही सिंधूचं ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. सिंधूने 2016 साली ऑलिम्पिक पदार्पण केलं. सिंधूने पहिल्याच झटक्यात कांस्य पदत मिळवत जोरात सुरुवात केली. सिंधूने त्यानंतर एक पाऊल पुढे टाकत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. त्यामुळे यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधूकडून इतर कोणत्याही नाही, तर फक्त नि फक्त सुवर्ण पदकाचीच आशा आहे. त्यामुळे सिंधूची यंदा पदकाची हॅटट्रिक ही सुवर्ण पदकासहच व्हावी, अशीच आशा भारतीय चाहत्यांना आणि समर्थकांना आहे.

दिग्गज आणि माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांनी गेल्या काही वर्षात अनेक तोडीस तोड खेळाड तयार केले. पीव्ही सिंधूही पी गोपीचंद यांच्याच मार्गदर्शनात घडली. फुलराणी सायना नेहवालप्रमाणेच सिंधूनेही हैदराबादमधील गोपीचंद अॅकेडमीतून बॅडमिंटनची बाराखडी गिरवली आणि स्वत:ला घडवलं. सिंधूला घरातूनच खेळाचं बाळकडू मिळालं. त्यामुळे सिंधूसाठी घरातच खेळासाठी पोषक वातावरण होते. तिचे आई वडील दोघेही नॅशनल लेव्हलचे व्हॉलीबॉलपटू. सिंधूच्या इथवरच्या प्रवासात जितकं योगदान तिच्या स्वत:चं आणि प्रशिक्षकांचं आहे तितकंच किंवा त्यापेक्षा अधिक हे तिच्या आई वडिलांचंही आहे.

भारताची पहिली वर्ल्ड चॅम्पियन

सिंधूने वयाच्या 8 व्या वर्षापासून रॅकेट हातात घेतलं. सिंधूने 2012 साली राष्ट्रीय पातळीर 2012 साली चायन मास्टर्समध्ये आपली छाप सोडली. सिंधूने तेव्हा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट ली ज्यूरुईचा धुव्वा उडवत पराभवाची धुळ चारली. त्यानंतर सिंधूने 2013 साली वयाच्या 18 व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशीप सेमी फायनलमध्ये धडक मारत कांस्क पदक मिळवलं. सिंधू या स्पर्धेत मेडल मिळवणारी दुसरी भारतीय आणि पहिलीच महिला भारतीय ठरली. सिंधूने त्यानंतर 2019 साली याच स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. सिंधू यासह या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय ठरली.

ऑलिम्पिकमध्ये मिशन गोल्ड

सिंधूने आपल्या पहिल्या रियो ऑलिम्पिक 2016 स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र सिंधूला फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलविना मारिन हीने पराभूत केलं. त्यामुळे सिंधूची पहिल्याच झटक्यात सुवर्ण पदकाची संधी हुकली. मात्र तिने रौप्य पदक पटकावलं. सिंधू बॅडमिंटन या खेळात ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी पहिलीच भारतीय ठरली. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये मेडल मिळवलं. मात्र सिंधूला तेव्हा कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं. मात्र सिंधूने यासह विक्रम केला. सिंधू सुशील कुमारनंतर ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी दुसरीच भारतीय ठरली. सिंधूने या व्यतिरिक्त कॉमनवेल्थ गेम्समध्येही 2 गोल्ड मेडल्स जिंकले आहेत. यातील प्रत्येकी 1-1 पदक हे सिंग्लस आणि मिक्स्ड असं होतं. तसेच 2 रौप्य पदकंही सिंधूने पटकावली आहेत. सिंधूने एशियन गेम्समध्ये 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलंय.

सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमधील उद्घाटन सोहळ्यात टीम इंडियाची ध्वजवाहक असणार आहे. सिंधूला गेल्या 2 वर्षांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सिंधूला फिटनेसमुळेही पदकांशी तडजोड करावी लागली. मात्र त्यानंतरही ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश मिळवेल, असा विश्वास भारतीयांना आहे. सिंधूकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून 3 मेडल्स जिंकणारी पहिली भारतीय हा बहुमान मिळवण्याची संधी आहे. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये पदकाची हॅटट्रिक पूर्ण करावी, इतकंच नाही, तर तिने पदकाचा रंग बदलावा अशी आशा तिच्या चाहत्यांची,समर्थकांची आणि साऱ्या भारतीयांची आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.