AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासा

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू असून आता राउंड 16चा थरार रंगणार आहे. राउंड ऑफ 16 मध्ये पोर्तुगालने क्रोएशियाला 2-1 ने मात दिली आणि आता राउंड 16 मध्ये स्पेनशी सामना होणार आहे. असं असताना ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीबाबत एक बातमी समोर आली आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासा
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासाImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 03, 2026 | 4:59 PM
Share

फुटबॉलचा स्टार खेळाडू असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय करिअरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रोनाल्डोची बहीण कटिया एविरोने त्याच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर पोर्तुगाल राष्ट्रीय संघासोबत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ही शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल करिअरमधून निवृत्ती घेईल. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीबाबत बहिणीने दिलेल्या माहितीनंतर क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पोर्तुगालने राउंड ऑफ 16 मध्ये एन्ट्री मारली आहे. या फेरीत पोर्तुगालचा सामना स्पेनशी होणार आहे. या दरम्यान रोनाल्डोबाबत आलेल्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याला एकही फुटबॉल वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. जर हा वर्ल्डकप शेवटचा असेल तर पोर्तुगालने जिंकावा अशी इच्छा त्याच्या चाहत्यांची आहे.

काय म्हणाली ख्रिस्तियानोची बहीण?

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो सहाव्यांदा भाग घेतला आहे.  41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर फुटबॉल क्लबकडून खेळतो. या स्पर्धेनंतर क्लब फुटबॉल खेळेल पण आंतरराष्ट्रीय फुटबॉल करिअरला रामराम ठोकणार, याची कल्पना चाहत्यांना होती. पण बहीण कटियाने स्पोर्ट्स वृत्तवाहिन्यांशी चर्चा करताना या खुलासा केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कटियाने सांगितलं की, ‘जिथपर्यंत हा प्रवास सुरू आहे तिथपर्यंत याचा पूर्ण आनंद घे. हा प्रवास खूप लवकर संपणार आहे. खूप जवळच्या आणि विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. त्यांच्या मते रोनाल्डोचा हा ‘लास्ट डान्स’ आहे.’ फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोने आतापर्यंत 3 गोल केले आहेत. साखळी फेरीत उझबेकिस्तानविरुद्ध 2 गोल केले. तर राउंड ऑफ 32 मध्ये क्रोएशियाविरुद्ध एक गोल मारला.

2030 फिफा वर्ल्डकप चर्चेला पूर्णविराम

पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेज यांनी एका पत्रकार परिषदेत मोठं विधान करत सांगितलं होतं की, रोनाल्डोचं फिटनेस पाहता तो 2030 फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळू शकतो. पण पोर्तुगाल फुटबॉल महासंघाचे हेड पेड्रो प्रोएनका यांनी प्रशिक्षकांच्या या वक्तव्याशी असहमती दर्शवली होती. प्रोएनका यांच्या मते, रोनाल्डोचं 2030 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणं आश्चर्यकारक असेल आणि त्याची शक्यता खूपच कमी आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा