मोठी बातमी : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची विम्बलडनमधून माघार, ‘हे’ कारण देत घेतली माघार

| Updated on: Jun 17, 2021 | 6:39 PM

काही दिवसांपूर्वीच राफेल फ्रेंच ओपन (French Open 2021) स्पर्धेत सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून (Novak Djokovic) सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला.

मोठी बातमी : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची विम्बलडनमधून माघार, हे कारण देत घेतली माघार
rafael nadal
Follow us on

माद्रिद : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) ज्याला टेनिसच्या क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं जात त्याने नुकतंच मानाची स्पर्धा असणाऱ्या विम्बलडन (Wimbledon) स्पर्धेतून माघार घेतली आहे. सोबतच त्याने टोक्यो ऑलम्पिक्समध्येही (Tokyo Olympics) खेळणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून (Novak Djokovic) फ्रेंच ओपनमध्ये (French Open 2021) पराभूत झाल्यानंतर आता नदालने विम्बलडनमधूनही माघार घेतली आहे. नदालने आपल्या ट्विटरवरुन एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. (Spanish tennis Superstar Rafael Nadal pulls out of Wimbledon and Tokyo 2020 Olympics)

नदालने या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांतून माघार घेण्याचं कारण फिटनेस दिलं आहे. अधिककाळापर्यंत टेनिस खेळण्यासाठी मला शरीराला आराम देण्यासाठी या स्पर्धांतून माघार घ्यावी लागत असल्याचं नदालने म्हटलंय. नुकतीच फ्रेंच ओपन (French Open 2021) स्पर्धा पार पडली असून विम्बलडन देखील 28 जून पासून सुरु होत आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये जास्त अंतर नसल्याने शरीराला आराम मिळणार नसल्याच कारण देत नदालने माघार घेतली आहे.

फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये नदाल पराभूत

फ्रान्समध्ये पार पडलेल्या फ्रेंच ओपनमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) राफेलला सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत केले आणि अंतिम सामन्यात S. Tsitsipas ला पराभूत करत चषक मिळवला. दरम्यान नदाल आणि नोवाक यांच्यातील सामना चुरशीचा झाला होता. सामन्याची सुरुवात नदालने जोरदार केली. बघता बघता त्याने पहिल्या सेटमध्ये 5-0 ची आघाडी घेतली. पण नोवाकने पण तीन गेम जिंकत सामन्यात चुरस बनवून ठेवली. पहिला सेट नदालने 6-3 च्या फरकाने जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये नोवाकने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवत 5-3 ने आघाडी घेतली नंतर राफेलने ही कडवी झुंज देत स्कोर 6-5 केला. सामना टाय ब्रेकमध्ये पोहोचताच निर्णायक सेट नोवाकने 7-4 ने जिंकत सामना आपल्या नावे केला होता.

हे ही वाचा :

(Spanish tennis Superstar Rafael Nadal pulls out of Wimbledon and Tokyo 2020 Olympics )