
हरियाणात बास्केटबॉल सरावादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. एक घटना बहादूरगड आणि दुसरी घटना रोहतकमध्ये घडली. या घटनेमुळे राज्यातील क्रीडा मैदानं आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मृत्यूच्या घटनेनंतर क्रीडाविश्वात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सरकारही खडबडून जागं झालं आहे. या घटनेची दखल हरियाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांनी घेतली आहे. या प्रकरणात जिल्हा खेळ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घटना घडलेल्या ठिकाणीतील संपूर्ण नर्सरी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच काय तर या घटनांची उत्तस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे.
या घटनेनंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्या विनेश फोगट यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विनेश फोगाट यांनी सांगितलं की, “सत्य हे आहे की हरियाणातील मुले मैदानात आपले प्राण गमावत आहेत आणि भाजप सरकार कागदावर आणि जाहिरातींमध्ये ‘विकास’ शोधत आहे. हे व्यवस्थेचे अपयश नाही, तर व्यवस्थेची हत्या आहे. आणि त्यासोबतच, मुलांची स्वप्ने, त्यांचा विश्वास आणि त्यांचे भविष्य मारले जात आहे. हे क्रीडा धोरण नाही, तर खेळाडूंच्या स्वप्नांची ही उघड हत्या आहे.”
हरियाणा जैसे खेल प्रधान राज्य में दो मासूम जिंदगियों 17 वर्षीय उभरते खिलाड़ी हार्दिक और 15 वर्षीय छात्र अमन की मौत ने पूरे प्रदेश को गहरे सदमे में डाल दिया है। हरियाणा को देश का ‘स्पोर्ट्स पावरहाउस’ कहा जाता है, यहां के बच्चे खेलों में अपनी प्रतिभा, मेहनत और जुनून से देश का नाम… pic.twitter.com/tK65xxnaDx
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) November 26, 2025
बहादुरगडच्या रेल्वे रोडवरील शहीद ब्रिगेडियर होशियार सिंह मैदानात रविवारी 15 वर्षीय बास्केटबॉलपटू अमन सराव करत होता. तेव्हा जीर्ण झालेला एक पोल अचानक तुटला आणि त्याच्या अंगावर पडला. पोल थेट अमनच्या पोटावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण प्रकृती खालावली आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. दहावीत शिकणाऱ्या नुकतेच शाळेच्या क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले होते.
रोहतकमधील कलानौर येथेही अशीच दुर्दैवी घटना घडली. बास्केटबॉल कोर्टवर सराव करत असलेल्या 17 वर्षीय हार्दिक राठीचा खांब तुटून त्याच्यावर पडल्याने मृत्यू झाला. हार्दिक हा एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू होता, त्याने दोनदा राष्ट्रीय सब-ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये खेळले होते.