FIFA World Cup: केप वर्डे संघाने रचला इतिहास, बाद फेरीत पोहोचताच नोंदवला असा विक्रम

फिफा वर्ल्डकप स्पर्धा आता राउंड 32 च्या दिशेने कूच करत आहे. असं असताना या स्पर्धेत केप वर्डे संघाने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत इतिहास रचला. या स्पर्धेत बाद फेरीत पोहोचणारा सर्वात छोटा देश ठरला आहे.

FIFA World Cup: केप वर्डे संघाने रचला इतिहास, बाद फेरीत पोहोचताच नोंदवला असा विक्रम
FIFA World Cup: केप वर्डे संघाने रचला इतिहास, बाद फेरीत पोहोचताच नोंदवला असा विक्रम
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 27, 2026 | 6:24 PM

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. असं असताना या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात केप वर्डे देशाने जगभरातील फुटबॉलप्रेमींची मनं जिंकली आहेत. अफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या 5 लाखांपेक्षा किंचित जास्त असलेल्या केप वर्डे देशाने ऐतिहासिक कामगिरी केली. फिफा वर्ल्डकप खेळणाऱ्या या लहान देशाने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना 0-0 ने बरोबरीत सोडवला. यासह राउंड 32 फेरीत जागा पक्की केली आहे. या कामगिरीसह केप वर्डे हा फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात बाद फेरीत पोहोचणारा जगातील सर्वात लहान देश ठरला आहे. विशेष म्हणजे केप वर्डे हा देश स्पर्धेतील कठीण गटात होता. असं असूनही केप वर्डेने अनपेक्षित कामगिरी केली आणि राउंड 32 मध्ये जागा पक्की केली आहे. केप वर्डेने साखळी फेरीत एकही सामना गमावला नाही.

केप वर्डेने पहिला फिफा वर्ल्डकप स्पर्धा 2026 मध्ये खेळली होती. या स्पर्धेत फिफा वर्ल्डकप 2010 विजेत्या स्पेनला 0-0 वर रोखलं होतं. तेव्हा या सामन्याची बरीच चर्चा रंगली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात उरग्वेविरुद्धचा सामना 2-2 ड्रॉ केला. त्यानंतर सौदी अरबविरुद्धचा सामनाही 0-0 ने बरोबरीत सोडवला. त्यामुळे या गटात 3 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं. तर स्पेनने उरुग्वेला पराभूत केलं आणि या गटात पहिलं स्थान पटकावलं. केप वर्डेच्या विजयात मोलाचा हातभार लागला तो 40 वर्षीय गोलकीपर वोजिन्हा याचा.. त्याने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने सौदी अरबविरुद्धच्या सामन्यात तीन अप्रतिम गोल वाचवले. त्यामुळे केप वर्डेला बरोबरी साधून राउंड 32 मध्ये स्थान पक्कं करता आलं.

केप वर्डेचा राउंड 32 मध्ये कोणाशी सामना?

साखळी फेरीच्या सामन्यांचा शेवटचा टप्पा सुरू आहे. आतापर्यंत 23 संघांनी राउंड 32 मध्ये एन्ट्री मारली आहे. तसेच 9 संघासाठी जोरदार चुरस आहे. असं असताना केप वर्डेचा राउंड 32 मध्ये कोणाशी सामना होणार हे ठरलं आहे. केप वर्डेला राउंड 32 मध्ये सर्वात कठीण आव्हान असणार आहे. गतविजेत्या अर्जेंटीना संघाशी सामना होणार आहे. हा सामना 3 जुलैला मियामीच्या मैदानात खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला टॉप 16 मध्ये स्थान मिळणार आहे.

Follow Us