Tokyo Paralympics 2020: भाविनाने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला, सिल्वर मेडल पटकावलं, क्रीडादिनी देशवासियांचा जल्लोष!

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले आहे. टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने तिच्या चमकदार खेळाने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. भाविनाने आपल्या दिमाखदार खेळाने इतिहास रचलाय. अंतिम सामन्यात तिने रौप्य पदक जिंकून क्रीडादिनी देशवासियांना जल्लोषाची संधी दिलीय.

Tokyo Paralympics 2020: भाविनाने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला, सिल्वर मेडल पटकावलं, क्रीडादिनी देशवासियांचा जल्लोष!
भाविना पटेल

Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले आहे. टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने (Bhavina patel) तिच्या चमकदार खेळाने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. भाविनाने आपल्या दिमाखदार खेळाने इतिहास रचलाय. अंतिम सामन्यात तिने रौप्य पदक जिंकून क्रीडादिनी देशवासियांना जल्लोषाची संधी दिलीय. विशेष गोष्ट म्हणजे भाविनाने तिच्या पहिल्याच पॅरालिम्पिक गेम्समध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे. अंतिम सामन्यात भाविनाला 3-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले. तिला हा पराभव जागतिक क्रमवारीत नंबर वन चायना पॅडलरकडून स्वीकारावा लागला. तिने भाविनाला कोणत्याही गेममध्ये शेवटपर्यंत वर्चस्व मिळू दिले नाही. चिनी पॅडलरने भाविना रोचाने 7-11, 5-11, 6-11 असा भाविनीचा पराभव केला.

पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदकाची कमाई

भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपली मोहीम नेटाने सुरु केली होती. तिने या स्पर्धेच्या प्रवासात जागतिक क्रमांक 2, जागतिक क्रमांक 3 सारख्या खेळाडूंना धूळ चारली होती. तिला खेळताना पाहून असे वाटले नाही की ती प्रथमच पॅरालिम्पिक खेळांच्या मंचावर उतरली आहे. पण, खळबळ उडवून देणाऱ्या भाविनाला सुवर्णपदकाची लढत जिंकण्यात यश आले नाही. सुवर्ण विजयाच्या लढाईत जगातील 12 व्या क्रमांकाच्या भाविनाला जागतिक क्रमवारीत चीनच्या झोउ जिंगच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले.

राष्ट्रीय क्रीडादिनी देशवासियांचा जल्लोष

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिसपटू भाविना पटेलचे रौप्य पदक जिंकल्याचा आनंदही द्विगुणित करणारा आहे कारण राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी भारताला पदक मिळालेलं आहे. अर्थात, या दिवशी खेळाडूंचा सन्मान होतो. त्याच दिवशी 34 वर्षीय भारतीय पॅडलरने आपल्या खेळात देशाचं नाव रोशन केलं आहे. पहिलं पॅरालिम्पिक खेळताना भाविनावर कोणताही दबाव नव्हता. तिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आत्मविश्वास होता, ज्यावर ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली.

(TOkyo paraolympic 2020 bhavina patel Creates history Wins Silver medal in women tennis For India)

हे ही वाचा :

Tokyo Paraolympics 2020 : भाविनाने इतिहास रचला, गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर, टेबल टेनिसमध्ये मेडल पक्कं!

Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, भारताचं पदक पक्क

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI