Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, भारताचं पदक पक्क

टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेलने ऐतिहासिक कामगिरी करत सेमीफायनलमध्ये धडक घेतली आहे. सुरुवातीचा एक सामना पराभूत झाल्यानंतर भाविनाने सलग तीन सामने जिंकले आहेत.

Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, भारताचं पदक पक्क
भाविना पटेल
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 6:06 PM

Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) अप्रतिम कामगिरी केल्यानंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही (Tokyo Paralympics-2020) भारताचे पॅरा एथलिट्स आपला झेंडा फडकावत आहेत. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने (Bhavina Patel) सलग तीन सामने जिंकत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवल्यामुळे तिने भारतासाठी किमान कांस्य पदक पक्के केले आहे. त्यामुळे भारताचं पॅरालिम्पिकमधील पदकाचं खातं उघडलं गेलं आहे.

भाविनाने जगातील नंबर दोनची खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या बोरिस्लावा पेरि (Borislava Perić) हीला 3-0 ने मात देत सामना जिंकला. आता भाविना अंतिम 4 मध्ये पोहोचली असून पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. तिने हा सामना 11-5, 11-6 आणि 11-7 अशा सरळ तीन सेट्समध्ये जिंकत आपल्या नावे केला.

भाविना पटेलने रचला इतिहास

भारताच्या भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक्सच्या टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास रचला आहे. या खेळात सेमीफायनलपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी भाविनाने आज सकाळीच राउंड ऑफ 16 च्या सामन्यात  ब्राझीलच्या ओलिविएराला मात देत विजय मिळवला होता. भाविनाने तिसऱ्या सेटमध्ये हा सामना जिंकला. सामन्यात भाविनाने पहिला सेट 12-10 ने, दूसरा सेट 13-11 ने आणि तिसरा सेट 11-6 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला होता. त्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने सर्बियाच्या बोरिस्लावाला 3-0 ने मात सेमीफायनल गाठली आहे. भाविनाच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: भारताने उघडलं विजयाचं खातं, टेबल-टेनिसपटू भाविना पटेल दुसऱ्या सामन्यात विजयी

 Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

(Indias table tennis player bhavina patel won match and reached in Semi finals of tokyo paralympics)

Non Stop LIVE Update
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको.
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी.
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?.
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ.
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.