AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tokyo Paraolympics 2020 : भाविनाने इतिहास रचला, गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर, टेबल टेनिसमध्ये मेडल पक्कं!

भारताची महिला टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल (Bhavina Patel) हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paraolympics 2020) इतिहास रचला आहे. तिने क्लास 4 टेबल टेनिसच्या (Table Tennis) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केले आहे.

Tokyo Paraolympics 2020 : भाविनाने इतिहास रचला, गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर, टेबल टेनिसमध्ये मेडल पक्कं!
Bhavina Patel
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 8:14 AM
Share

Tokyo Paraolympics 2020 :  भारताची महिला टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल (Bhavina Patel) हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paraolympics 2020) इतिहास रचला आहे. तिने क्लास 4 टेबल टेनिसच्या (Table Tennis) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. तिने उपांत्य फेरीत चिनी पॅडलर झांग मियाओचा 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा पराभव करून ही कामगिरी केली. भाविना पटेल अंतिम फेरीत पोहचल्याने भारतासाठी रौप्य पदक आता निश्चित झाले आहे. आणि, जर आता असलेल्या सुपर फॉर्ममध्ये तिने जर ऐतिहासिक कामगिरी केली आणि अंतिम फेरीही जिंकली तर ती भारताला टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या इतिहासातील 5 वे सुवर्णपदकही मिळवून देईल.

गोल्ड मेडलपासून केवळ एक पाऊल दूर

भाविना पटेलचे हे पहिले पॅरालिम्पिक आहे आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात तिने क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या मंचावर उत्तम कामगिरी केली आहे. अहमदाबादच्या 34 वर्षीय भाविनाने यापूर्वी उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आणि 2016 च्या रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रॅन्कोवीला उपांत्यपूर्व फेरीत सरळ गेममध्ये 3-0 ने पराभूत केले होते आणि आता उपांत्य फेरीत तिने चीनी पॅडलरला 3-2 ने पराभूत केले.

सुवर्णपदक जिंकेन, भाविनाचा आत्मविश्वास

भाविनाचे लक्ष्य आता सुवर्णपदक आहे, कोणत्याही परिस्थितीत मी सुवर्णपदक जिंकणारच, असा तिचा विश्वास आहे. अंतिम फेरीत मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करीन आणि सामना जिंकेल, असं पहिली पॅरालिम्पिक खेळणारी भाविना म्हणाली. जेव्हा मी इथे खेळायला आली होती, तेव्हाही मी फक्त या विचारात होती की फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावं आणि सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी आणि आतापर्यंत णी हेच करत आहे. आता फक्त एका सामन्यााचा विषय आहे, असं भाविना म्हणाली.

भाविना सुवर्णपदक जिंकेल, भारतीयांना विश्वास

टोकियो पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत भाविनाने अंतिम फेरी गाठत रौप्य पदक मिळवले आहे. सुवर्णपदक जिंकण्याचं तिचं लक्ष्य आहे आणि ज्या सुपर फॉर्म मध्ये भाविना आहे, ते पाहून ती सुवर्णपदक सुद्धा नक्की जिकेंल, असा विश्वास भारतीयांना वाटत आहे.

(Tokyo Paraolympics 2020 India bhavina patel Creates history reaches final class 4 table tennis)

हे ही वाचा :

Tokyo Paralympics: भारतीय तिरंदाजांची उत्तम सुरुवात, रँकिंग राउंडमध्ये टॉप 10 मध्ये दोन भारतीय

Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, भारताचं पदक पक्क

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.