Tokyo Paralympics: भारतीय तिरंदाजांची उत्तम सुरुवात, रँकिंग राउंडमध्ये टॉप 10 मध्ये दोन भारतीय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 11:19 AM

भारतीय तिरंदाजांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये चांगली सुरुवात केली आहे. जगातील 11 व्या क्रमाकांचा तिरंदाज राकेशने यावर्षीच दुबईमध्ये विश्व रँकिंग टूर्नामेंटमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याने पॅरालिम्पिकमध्येही शानदार सुरुवात केली आहे.

Tokyo Paralympics: भारतीय तिरंदाजांची उत्तम सुरुवात, रँकिंग राउंडमध्ये टॉप 10 मध्ये दोन भारतीय
राकेश कुमार

Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo paralympics) शुक्रवारचा दिवस भारतासाठी चांगला ठरला. महिला टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेलने सेमीफायनलमध्ये पोहोचत ऐतिहासिक कामगिरी केली. तिने पॅरालिम्पिकमधील पहिलं पदक भारतासाठी पक्क केलं आहे. याशिवाय तिरंदाजीमध्येही भारतीयांनी उत्तम सुरुवात केली. भारतीय कंपाउंड तिरंदाज राकेश कुमारने (Rakesh Kumar) कारकिर्दीतील सर्वोत्कष्ट प्रदर्शन करत 720 पैकी 699 गुण मिळवत पॅरालिम्पिक खेळांमध्ये पुरूष वर्तात रँकिंग राउंडमध्ये तिसरा क्रमांक मिळवला. राकेशसोबत विवेक चिकारा हादेखील टॉप 10 मध्ये जागा मिळवण्यात यशस्वी राहिला.

या दोघांशिवाय भारताचा तिरंदाज श्याम सुंदर स्वामीने 682 गुण मिळवत 21 वं स्थान मिळवलं. तर पॅरालिम्पिक खेळांमध्ये पात्रता मिळवणारी एकमेव भारतीय महिला तिरंदाज ज्योति बालीयानने 15 वं स्थान मिळवलं. तिने 671 गुण मिळवले. तिला आणि राकेशला मिश्र फेरीत सहावं स्थान मिळालं. ते दोघेही थायलंडच्या खेळाडूंविरुद्ध पुढील सामना खेळतील.

टेक चंद मात्र अयशस्वी

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक असणारा शॉटपुट खेळाडू टेक चंद मात्र खास कामगिरी करु शकलेला नाही. फायनलमध्ये खास कामगिरी करु न शकल्याने तो पदक मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे. आधी पहिल्या प्रयत्नात त्याने फाऊल केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो 8.57 मीटर थ्रो करु शकला. ज्य़ानंतर तिसऱ्या प्रयत्नात तो पुन्हा फाऊल ठरला. अखेर चौथ्या प्रयत्नातही तो केवळ 9.04 मीटर दूर थ्रो फेकू शकल्याने तो पदक मिळवू शकला नाही.

इतर बातम्या

Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, भारताचं पदक पक्क

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: भारताने उघडलं विजयाचं खातं, टेबल-टेनिसपटू भाविना पटेल दुसऱ्या सामन्यात विजयी

(Indias two para archers in top ten at ranking round in tokyo paralympics)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI