Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कट? विनेश फोगाट काँग्रेस प्रवेशानंतर म्हणाली….

Vinesh Phogat On Paris Olympics 2024 : विनेश फोगाट हीने कुस्तीतील निवृत्तीनंतर नव्या इनिंगला सुरुवात केली. विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेशने त्यानंतर तिच्यासोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय झालं? याबाबत सांगितंल.

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कट? विनेश फोगाट काँग्रेस प्रवेशानंतर म्हणाली....
vinesh phogat
| Updated on: Sep 06, 2024 | 7:36 PM

हरयाणा विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहे. अशात कु्स्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रवेशानंतर महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत काय झालं? याबाबत सांगितलं. लढाई अजूनही सुरुच आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच आपल्या बाजूने निकाल लागेल, अशी आशा विनेशने व्यक्त केली. विनेश फोगाट हीला वाढीव वजनामुळे ऑलिम्पिकमधून अपात्र करण्यात आलं होतं. विनेश ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात खेळत होती. मात्र वाढीव वजनामुळे विनेशला हक्काचं रौप्य पदक गमवावं लागलं होतं. तसेच सुवर्ण पदकाच्या सामन्याची संधीही गमवावी लागली होती.

विनेशने पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. विनेशने या दरम्यान तिला विचारण्यात आलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील अपात्रतेबाबच्या प्रश्नावरुन उत्तर दिलं. “लढाई अजुनही सुरुच आहे. लढाई संपलेली नाही. सध्या हा विषय न्यायलयात आहेत. आम्ही ही लढाई नक्कीच जिंकू तसेच आयुष्याची लढाईही जिंकून दाखवू. मी माझ्या कारकीर्दीत हार मानली नाही. तसेच या नव्या प्रवासात देशाप्रती असलेली भावना फक्त बोलण्यापुरतं मर्यादीत नसेल”, असं विनेशने स्पष्ट केलं.

विनेशविरोधात कट रचला गेला होता का? असा प्रश्नही विनेशला विचारण्यात आला. यावरही विनेशने उत्तर दिलं. “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कट रचला होता की नाही, याचं उत्तर मी निवांतपणे देईन कारण माझ्यासाठी हा विषय फार भावूक असा आहे. आयुष्यभराच्या मेहनतीनंतर मी तिथवर पोहचले होते. मी याबाबतची सर्व सविस्तर माहिती देईन. मात्र त्या विषयावर बोलण्यासाठी मला भावनिकरित्या भक्कम व्हावं लागलं, ज्यामुळे मी ठामपणे सर्वांसमोर खरं काय ते सांगू शकेन”, असंही विनेश फोगाट हीने नमूद केलं.

विनेशने काय सांगितलं?

विनेशकडून आश्वासन

दरम्यान विनेशने राजकीय पक्षप्रवेशानंतर सर्वांना आश्वासन दिलं. “मी तुमच्यासोबत आहे. तुमच्यासोबत राहून फार मेहनत करेन. मी तुम्हा सर्वांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करेन”, असंही विनेशने म्हटलं.