FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं? सर्व काही जाणून घ्या

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून 48 संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. असं असताना या 48 संघात भारत का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 100 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देश फुटबॉल स्पर्धेत पात्र ठरला नसल्याने आश्चर्य वाटत आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताची कामगिरी कशी राहिली आणि काय झालं ते सविस्तर जाणून घेऊयात...

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं? सर्व काही जाणून घ्या
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं? सर्व काही जाणून घ्या
Image Credit source: All India Football Federation
| Updated on: Jun 12, 2026 | 9:17 PM

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या स्पर्धेचं यजमानपद पहिल्यांदाच तीन देशांकडे आहे. अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या देशात ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ भाग घेत आहेत. मागच्या पर्वात फक्त 32 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. म्हणजेच यंदाच्या पर्वात 16 संघ अधिक आहेत. असं असताना या 48 संघात भारतीय संघ नाही याचं आश्चर्य वाटत आहे. फुटबॉल संघांची संख्या वाढूनही भारतीय संघ का नाही? असा प्रश्न फुटबॉलप्रेमींना पडल्याशिवाय राहात नाही. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पात्र होण्यासाठी भारतीय संघ आशियाई पात्रता फेरीत खेळत होता. या गटात भारतासह कतार, कुवेत आणि अफगाणिस्तान हे संघ होते. या गटात टॉप 2 असतील त्या संघांना फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळणार होतं. या गटातून कतार आणि कुवेतने चांगली कामगिरी केली आणि फिफा वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवलं. भारतीय फुटबॉल संघ या गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us