AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jenni Hermoso Controversy Video : भर मैदानात अध्यक्षाकडून महिला खेळाडूला किस, फिफाची मोठी कारवाई, पाहा Video

वर्ल्ड कप जिंकल्यावर स्पेनचे सर्व खेळाडू जल्लोष करत असताना स्पेन संघाची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला (Jenni Hermoso Kiss Video) या खेळाडूला भर मैदानात स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे (RFEF) अध्यक्ष लुईस रुबियालेस यांनी किस केलं होतं. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये.

Jenni Hermoso Controversy Video : भर मैदानात अध्यक्षाकडून महिला खेळाडूला किस, फिफाची मोठी कारवाई, पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 27, 2023 | 2:24 PM
Share

मुंबई : वुमन्स फिफा वर्ल्ड कपच्या (Womens FIFA World Cup) फायनल सामन्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडलेली.  इंग्लंड आणि स्पेनमध्ये झालेल्या फायनलमध्ये स्पेन संघाने 1-0 ने विजय मिळवला होता. (Luis Rubiales) वर्ल्ड कप जिंकल्यावर स्पेनचे सर्व खेळाडू जल्लोष करत असताना स्पेन संघाची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला (Jenni Hermoso Kiss Video) या खेळाडूला भर मैदानात स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे (RFEF) अध्यक्ष लुईस रुबियालेस यांनी किस केलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. अखेर लुईस रुबियालेस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

20 ऑगस्टला झालेल्या फायनलमध्ये स्पेनने विजय मिळवल्यानंतर महिला खेळाडू जेनी हर्मोसोला हिला मिठी मारत किस केलं. त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी संबंधित महिला खेळाडूने तिला किस घेतलेलं आवडलं नसल्याचं जाहीरपणे सांगितलं.

अनेक फुटबॉलपटूंनी लुईस रुबियालेस यांच्यावर टीका केली. इतकंत नाहीतर स्पेनच्या पंतप्रधानांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं. FIFA ने Rubiales प्रकरणाची शिस्तभंगाची चौकशी सुरू केली होती. अखेर रुबियालेस यांनी केलेल्या कृत्याची माफी मागितली पण आपण राजीनामा देणार नसल्याचं सांगितलं.

रुबियालेस यांच्या या भूमिकेनंतर वुमन्स वर्ल्ड कपमधील सर्व महिला खेळाडूंनी रुबियालेस राजीनामा देत नाहीतर तोपर्यंत स्पॅनिश संघाकडून खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर FIFA च्या शिस्तपालन समितीने त्याच्या नियमांच्या कलम 51 नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करत रुबियालेस यांना पदावरूव निलंबित केलं आहे.

पाहा व्हिडीओ-:

दरम्यान, लुईस रुबियालेस यांना 90 दिवसांसाठी निलंबित केलं आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्पेनमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र या प्रकारामुळे त्या आनंदाच्या क्षणाला तडा गेला. भर मैदानात असा प्रकार होणं ही लाजिरवाणी बाब आहे.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल