
रविवारी, 21 सप्टेंबर रोजी झालेला भारत आणि पाकिस्तानमधील सामना चांगलाच चर्चेत आहे. भारताने सुपर 4 फेरीत 6 विकेट्सने मात करत विजय मिळवला. तसेच फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा खेळाडू साहिबझादा फरहाने केलेल्या कृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने अर्धशतक झळकवताच हातातील बॅट बंदूकीप्रमाणे पकडली आणि हवेत गोळीबार केल्यासारखे भासवले. त्याच्या कृत्याने संतापाची लाट पसरली आहे. अशातच आता पाकिस्तानी कॉमेंटेटरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.
काय आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ?
सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एका यूजरने पाकिस्तानी कॉमेंटेटरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिघांमध्ये संवाद सुरु असते. हा व्हिडीओ पाकिस्तानी शोमधील आहे. शोमध्ये एक व्यक्ती बोलत आहे की क्रिकेटपटू हे रेडबूल पिताना दिसतात. त्यानंतर अँकर शोमधील गेस्ट, कॉमेडियन मुस्ताफ चौधरीला विचारतो की सर, जर इथून पुढे क्रिकेटर्सने खेळताना थोडा आणखी जेव ओतला तर आपण सामना जिंकू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देत तिसऱ्या व्यक्तीने, ‘मला असे वाटते एक तर असे करावे किंवा काहींनी (भारतीय खेळाडूंवर) फायरिंगचा करायला हवी होती. सामनाच संपला असता. कारण आपण हारणार हे नक्की.’
Shameless Pakistani commenter saying
We are losing this game, so Pakistani players Haris Rauf, Shaheen Afridi, Sahibzada Farhan etc should do firing
Kill Indian players and end the game
pic.twitter.com/ZzCAIdC1IN— Yanika_Lit (@LogicLitLatte) September 21, 2025
सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी कॉमेंटेटरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने हा शेअर करत, निर्लज्ज पाकिस्तानी कॉमेंटेटर म्हणतोय आपण हा सामना हरत आहोत, म्हणून पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, साहिबजादा फरहान इत्यादींनी गोळीबार करावा. भारतीय खेळाडूंना मारून खेळ संपवावा.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानचा खेळाडू साहिबझादा फरहानने टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक, 58 धाव्या केल्या. त्याने 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानंतर साहिबझादाच्या डोक्यात हवा गेली. त्याने अर्धशकत झाल्यानंतर ज्या प्रकारे सेलिब्रेशन केले ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. साहिूबझादाने अर्धशतक झाल्यावर हातातली बॅट बंदूकीसारथी पकडली आणि फायरिंग करण्याची अॅक्शन केली. ते पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.