Palaash Muchhal : स्मृती मंधानाचा होणार नवरा पलाश मुच्छल पुन्हा हॉस्पिटलमध्ये का? लग्न टळल्यानंतर घडतायत धक्कादायक गोष्टी

Palaash Muchhal : स्मृति मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबरला लग्न होणार होतं. पण लग्नाच्या काही तास आधी अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात हलवावं लागलं. त्यानंतर स्मृती आणि पलाशच्या बाबतीत अनेक धक्कादायक गोष्टी घडत आहेत.

Palaash Muchhal  : स्मृती मंधानाचा होणार नवरा पलाश मुच्छल पुन्हा हॉस्पिटलमध्ये का? लग्न टळल्यानंतर घडतायत धक्कादायक गोष्टी
Smriti mandhana-Palaash Muchhal
| Updated on: Nov 25, 2025 | 5:12 PM

Palak Muchhal Video : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार फलंदाज स्मृती मंधाना यांच्या लग्नाची बऱ्याच महिन्यांपासून चर्चा होती. दोघे 23 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकणार होते. हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम झालेला. पण त्याचवेळी अचानक स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात हलवलं. त्यानंतर लग्न पुढे ढकलत असल्याचं जाहीर करण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं दिसून आली. त्यांना सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. आता बातमी आहे की, पलाश मुच्छलला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. रुग्णालयात त्याला भेटण्यासाठी त्याची बहिण आणि बॉलिवूड सिंगर पलक मुच्छल पोहोचली आहे.

लग्न टळण्याबद्दल अजूनपर्यंत दोन्ही कुटुंबांकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं नाही. फक्त लग्न पुढे ढकललय एवढच सांगितलं जातय. आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पलाश मुच्छलचं अफेअर असल्याचं बोललं जातय. तणावामुळे पलाशला मुंबईच्या एसआरवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात पलक मुच्छल आपल्या गाडीतून उतरुन रुग्णालयाच्या आता जाताना दिसतेय. तिथे पलाश दाखल असल्याचा दावा करण्यात येतोय. या बद्दल अधिकृतपणे अजून कोणतीही पृष्टी करण्यात आलेली नाही. दोन्ही कुटुंबांनी सध्या प्रायवसीची मागणी केली आहे.

23 नोव्हेंबरला दोघे सात फेरे घेणार होते

स्मृती आणि पलाशच लग्न महाराष्ट्रात सांगलीच्या समडोली रोडवरील मंधाना फार्म हाऊसवर होणार होतं. लग्नाचे विधी 20 नोव्हेंबरपासून सुरु झालेले. 23 नोव्हेंबरला दोघे सात फेरे घेणार होते. पण त्याआधी स्मृतीचे वडिल श्रीनिवास मंधाना यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

प्रायवसीचा आदर करावा

त्यानंतर पलाशही तणावाखाली असल्याचं समोर आलेलं. पलकने लग्न टळल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली. त्यात तिने लिहिलेलं की, “स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीच्या कारणास्तव स्मृती आणि पलाशचं लग्न स्थगित करण्यात आलय. आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो की, या संवेदनशील समयी कुटुंबाच्या प्रायवसीचा आदर करावा”