
बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाचा प्रियकर पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होता. मात्र ऐन लग्नावेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली त्यांना हार्टअटॅक आला त्यामुळे त्यांना तातडीने सांगलीतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आलं.
स्मृती आणि पलाशमध्ये सर्व काही ठीक आहे का?
तसेच स्मृतीच्या वडिलांवर उपचार होत असताना तिचा होणार नवरा पलाश मुच्छलचही तब्येत बिघडली होती आणि त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता स्मृतीच्या वडिलांची आणि पलाशचीही तब्येत ठिक आहे. श्रीनिवास मानधना मात्र अजूनही रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान हे सगळं सुरु असतानाच स्मृतीने मात्र तिच्या सोशल मीडियावरून तिच्या साखरपुड्याचे सगळे फोटो, व्हिडीओ डिलीट केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे स्मृती आणि पलाशमध्ये सर्व काही ठीक नाही अशा अफवा पसरत होत्या.
पलाश मुच्छलच्या पोस्टची चर्चा
पण आता पलाश मुच्छलने याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामुळे लग्न कधी होणार आहे किंवा सध्याची परिस्थिती काय आहे हे स्पष्ट झालं आहे. त्याने या पोस्टद्वारे लग्न पुढे ढकलण्याबाबत अपडेट दिली आहे. पलाशने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “स्मृतीच्या वडिलांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे स्मृती आणि पलाश लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. या संवेदनशील काळात मी सर्वांना दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर राखण्याची विनंती करतो.” अशी पोस्ट करत दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर राखण्याचे आवाहन पलाशलोने केलं आहे. त्याच्या या पोस्टमुळे स्मृतीच्या वडिलांची तब्येत पूर्णपणे ठिक होत नाही तोपर्यंत त्यांचे लग्न हे पुढे ढकलण्यात आल्याचं लक्षात येत आहे.
आता लग्न नक्की कोणत्या तारखेला होणार?
या पोस्टमध्ये त्याने त्यांचे लग्न नक्की पुढे कोणत्या तारखेला होणार आहे, कधी होणार आहे याबद्दल काहीही अपडेट दिली नाही. पण लग्न पोस्टपोन झाल्याचं मात्र स्पष्ट केलं आहे. तसेच त्याच्या या पोस्टमुळे स्मृती आणि पलाशमध्ये सर्व काही ठिक आहे का असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते किंवा ज्या काही अफवा पसरत होत्या त्यांना पूर्णविराम मिळाला आहे.