AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाश्ता केला अन् थोड्यावेळाने…हार्टअटॅकच्या आधी स्मृती मानधनाच्या वडिलांसोबत नक्की काय घडलं?

भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होता. मात्र यादरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्टअटॅक आल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच स्मृती आणि पलाश यांचा विवाहसोहळा देखील पुढे ढकलण्यात आला आहे.

नाश्ता केला अन् थोड्यावेळाने...हार्टअटॅकच्या आधी स्मृती मानधनाच्या वडिलांसोबत नक्की काय घडलं?
Smriti wedding postponed, what happened to Smriti father before his heart attackImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2025 | 4:41 PM
Share

भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होता. त्याची जय्यत तयारी झाली होती. लग्नाचा 4.30चा मुहूर्तही ठरला होता मात्र त्याआधीच एक दुर्दैवी घटना घडली.ती म्हणजे स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्टअटॅक आला. लग्नाची तयारी सुरु असताना अचानक ही घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

स्मृतीच्या लग्नसोहळा पुढे ढकलला

स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. अचानक श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहे. समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. श्रीनिवास यांना सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी करण्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

फार्म हाऊसवर तिच्या वडिलांसोबत नक्की काय घडलं?

दरम्यान याबद्दल श्रीनिवास यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर तोहीन मिश्रा यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. ते म्हणाले की, “आज सकाळी (23 नोव्हेंबर 2025) फार्म हाऊसवरच नाश्ता करत असताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली होती. पण आम्हाला वाटलं बरी होईल. म्हणून थोडावेळ थांबलो. पण त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुधारतेय. स्मृतीचा वडिलांवर जीव आहे. त्यामुळे जोपर्यंत वडील बरे होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही, असं तिने ठरवलंय.” अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. तसेच मानधना कुटुंबाची प्रायव्हसी जपा, असं आवाहन देखील डॉक्टरांनी केलं आहे.

लग्न स्थळाच्या ठिकाणी नक्की कसं वातावरण?

दरम्यान श्रीनिवास मानधना यांची तब्येत ठिक होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून. तोपर्यंत त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे आता लग्नसोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनाही परत पाठवण्यात आलं आहे. लग्न सोहळ्यासाठी क्रीडा व विविध क्षेत्रातल्या दिगज्यांची उपस्थिती लागणार होती मात्र सगळाच कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच लग्न स्थळाच्या ठिकाणी डेकोरेशन काढण्याचे काम सुरु आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.