Arjun Tendulkar : पी. अर्जुन तेंडुलकरची तुफानी बॅटिंग, 258 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी, फोर-सिक्सचा पाऊस
Arjun Tendulkar : 19 ऑगस्ट 2025 रोजी APL चा सामना झाला. त्यात अर्जुन तेंडुलकरने ओपनिंगला येत प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने जितके सिक्स मारले, तितकचे फोरही ठोकले.

अर्जुन तेंडुलकरच नाव तुम्ही ऐकलं असेल. हा तोच, जो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. नुकताच अर्जुन तेंडुलकरचा सानिया चंडोक सोबत साखरपुडा झाला. पण आम्ही इथे त्या अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलत नाहीय. आम्ही पी. अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलतोय. नाव भले एकसमान असेल, पण हे दोन्ही वेगवेगळे खेळाडू आहेत. आम्ही ज्या पी. अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलतोय, तो सध्या आंध्र प्रीमियर लीगमध्ये खेळतोय. सचिनचा मुलगा अर्जुन प्रमाणे तो ऑलराऊंडर नाही, तर एक ओपनर आहे. दोघांमध्ये एकच समानता आहे, ते म्हणजे दोघे लेफ्टी फलंदाजी करतात. 19 ऑगस्ट 2025 रोजी APL चा सामना झाला. त्यात पी. अर्जुन तेंडुलकरने ओपनिंगला येत प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
आंध्र प्रीमियर लीगमध्ये 19 ऑगस्ट रोजी काकिंदा किंग्स आणि भीमावरम बुल्स मध्ये सामना झाला. भीमावरम बुल्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर 214 धावा केल्या. 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला काकिंद किंग्सची टीम मैदानात उतरली, त्यावेळी त्यांना धमाकेदार ओपनिंगची आवश्यकता होती. पी. अर्जुन तेंडुलकरने ही भूमिका चोख बजावली.
258 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी
20 वर्षाच्या पी. अर्जुन तेंडुलकरने ओपनिंगला येत तुफानी फटकेबाजी केली. चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने जितके सिक्स मारले, तितकचे फोरही ठोकले. त्याने आपल्या इनिंगमध्ये 50 टक्के चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले. 258 च्या स्ट्राइक रेटने धावा ठोकल्या. तेंडुलकर आडनाव असलेल्या या अर्जुनने काकिंदा किंग्सकडून सलामीला येत फक्त 12 चेंडू खेळला. यात त्याने 3 सिक्स आणि 3 फोर मारले.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाकडून अर्जुन बाद
पी. अर्जुन तेंडुलकरने स्फोटक फलंदाजीचा नजराणा पेश केला.काकिंग किंग्सच्या स्कोर बोर्डवर 32 धावा असताना पहिला विकेट गेला. यात 31 धावा एकट्या अर्जुनच्या होत्या. अर्जुन तेंडुलकर इनिंगच्या 13 व्या चेंडूवर आऊट झाला. IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा गोलंदाज सत्यनारायण राजूने त्याला आऊट केलं. 26 वर्षाच्या राजूने यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केलेला. तो मीडियम पेस गोलंदाजी करतो. याचवर्षी डेब्यु करताना त्याने दोन सामन्यात एक विकेट काढला. अर्जुन तेंडुलकरने तुफानी स्टार्ट दिली. पण तरीही टीम विजयाचा उंबरठा ओलांडू शकली नाही. भीमवरम बुल्सने त्यांना 27 धावांनी हरवलं.
