
मुंबई : सध्या लग्नाच्या मंडपातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात, त्यामध्ये कायतरी हटके पाहायला मिळतं. त्याचपद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरा लग्नात क्रिकेटसारखे (Cricket) खेळत असल्याचं दिसतंय. इतर लोक लग्नाच्या तयारीत असताना, नवरा मुलगा मात्र खुशाल खेळत असल्यामुळे त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
विशेष म्हणजे नवरा क्रिकेट खेळत असल्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांनी व्हिडीओच्या खाली कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले आहेत. तर अनेकांनी व्हिडीओ आवडल्याचे सांगितले आहे.
ज्यावेळी लग्नातील विधी सुरु आहे. त्यावेळी नवऱ्या मुलाचे मित्र नवऱ्याच्या अंगावर झेंडूची फुले टाकत आहेत. पंडीत आणि काही नातेवाईत सुध्दा त्या व्हिडीओत तिथं दिसत आहेत.
ज्यावेळी नवऱ्या मुलाचे मित्र त्याला झेंडू मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी तो त्याच्या हातात असलेल्या बॉक्सने क्रिकेटसारखे शॉ
मारत आहे. हा व्हिडीओ विविध सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या नवऱ्या मुलाची अधिक चर्चा सुरु आहे.