पृथ्वी शॉची 185 धावांची धमाकेदार खेळी, धोनी आणि विराटचा विक्रम मोडीत

मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर पृथ्वी शॉ याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे (Prithvi Shaw breaks Mahendra Singh Dhoni and Virat Kohli record in Vijay Hazare trophy).

पृथ्वी शॉची 185 धावांची धमाकेदार खेळी, धोनी आणि विराटचा विक्रम मोडीत
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 6:44 PM

मुंबई : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबई विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर पृथ्वी शॉ याने 123 चेंडूत 21 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 185 धावांची नाबाद खेळी साकारून आपल्या संघाला 9 विकेटने मोठा विजय मिळवून दिला. या खेळीमुळे त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीचा एक विक्रमही मोडीत काढला आहे (Prithvi Shaw breaks Mahendra Singh Dhoni and Virat Kohli record in Vijay Hazare trophy).

धोनी आणि कोहलीचा नेमका विक्रम काय?

2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध धावांचा पाठलाग करताना महेंद्रसिंह धोनीने नाबाद 183 धावांची खेळी केली होती. तर विराट कोहलीने 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना 183 धावा फटकवल्या होत्या. त्यानंतर आता प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पृथ्वी शॉने 185 धावांची खेळी करत या दोन दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडला आहे. तसेच शॉ लिस्ट ए (प्रथम श्रेणी क्रिकेट) क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

सौराष्ट्रची प्रथम फलंदाजी

दरम्यान, या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 5 गाड्यांच्या बदल्यात 284 धावा केल्या होत्या. सौराष्ट्रकडून समर्थ व्यासने नाबाद 90 धावा केल्या, तर विश्वराज जडेजा आणि चिराग जानीने प्रत्येकी 53 धावांची खेळी केली (Prithvi Shaw breaks Mahendra Singh Dhoni and Virat Kohli record in Vijay Hazare trophy).

पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल यांची 238 धावांची भागीदारी

285 धावांचे आव्हान घेऊन मुंबईचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल मैदानात आले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 238 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जयस्वालच्या रूपात सौराष्ट्राला पहिली आणि एकमेव विकेट मिळाली, त्याने 104 चेंडूत 70 धावांची खेळी केली. जयस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आदित्य तरे याने 24 चेंडूत 20 धावांची नाबाद खेळी साकारून शॉसोबत मिळून सामना जिंकण्यासाठीची औपचारिकता पूर्ण केली.

मुंबईची उपांत्य फेरीपर्यंत मजल

या विजयासह मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. उपांत्य फेरीत मुंबईचा सामना कर्नाटकशी होणार आहे. उभय संघांमध्ये 11 मार्च रोजी अटीतटीच्या सामना पाहायला मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.