PV Sindhu Net Worth: आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरंच काही… गंडगंज संपत्तीची मालकीण पी.व्ही.सिंधू

PV Sindhu Net Worth: 'या' मार्गांनी पी.व्ही.सिंधू कमावते कोट्यवधींची माया, आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरंच काही..., इतक्या कोटी रुपयांची मालकीण आहे पी.व्ही. सिंधू..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पी.व्ही सिंधू हिची चर्चा...

PV Sindhu Net Worth: आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरंच काही... गंडगंज संपत्तीची मालकीण पी.व्ही.सिंधू
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 11:31 AM

PV Sindhu Net Worth: भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बॅटमिंटनपटून पी.व्ही.सिंधू आता नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पी.व्ही सिंधू आता लवकरच लग्नबंधनात अडकरणार आहे. (PV Sindhu Marriage date) . पी.व्ही. सिंधू 22 डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये हैदराबादच्या व्यंकट दत्ता साईसोबत लग्न करणार आहे. पीव्ही सिंधूच्या वडिलांनी लेकीच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, नुकताच लखनऊ येथे झालेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत पीव्ही सिंधूने विजेतेपद पटकावले. सन 2019 मध्ये, पी.व्ही. सिंधूने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर आणि ब्रॉन्जसह एकूण 6 पदके जिंकली.

पीव्ही सिंधूच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाशी संबंधित सर्व कार्यक्रम 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत, पीव्ही सिंधूच्या लग्नाशी संबंधित बातम्यांदरम्यान, जाणून घेऊया तिच्याकडे किती संपत्ती आहे.

PV Sindhu Net Worth: किती संपत्तीची मालकीण आहे पीव्ही सिंधू?

पीव्ही सिंधू ही जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, पीव्ही सिंधूची कमाई सुमारे 7.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 60 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये पी.व्ही. सिंधू हिची कमाई 8.5 मिलियन डॉलर होती. 2019 मध्ये 5.5 मिलियन डॉलर कमाई होती. तर 2021 मध्ये पी.व्ही. सिंधू हिची कमाई 7.2 मिलियन डॉलर होती. 2022-2023 मध्ये पी.व्ही सिंधू हिची कमाई 7.1 मिलियन डॉलर होती.

हे सुद्धा वाचा

बॅटमिंटन शिवाय इतर मार्गांनी देखील पी.व्ही. सिंधू गडगंड पैसे कमावते. जाहिरातींच्या माध्यमातून देखील पी.व्ही. सिंधू हिची तगडी कमाई होते. 2019 मध्ये, चीनी स्पोर्ट्स गुड्स कंपनी ली निंगसोबत 50 कोटी रुपयांचा चार वर्षांचा करार केला. पी.व्ही. सिंधू मेबेलाइन, बँक ऑफ बडोदा, एशियन पेंट्स आणि इतर यांसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँडची एंबेसडर आहे. पी.व्ही. सिंधूचे एंडोर्समेंट डील तिच्या कमाईत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हैदराबादमध्ये पी.व्ही. सिंधू हिचं आलिशान घर देखील आहे.

पी.व्ही. सिंधू हिचं कार कलेक्शन

पी.व्ही. सिंधू हिच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत. पी.व्ही. सिंधू हिच्याकडे BMW X5, BMW 320D कार आहे. BMW 320D ही कार पी.व्ही. सिंधू हिला क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांनी दिली आहे. पी.व्ही. सिंधूकडे एक महिंद्रा थार आहे, जी तिला आनंद महिंद्रा यांनी भेट दिली होती. पी.व्ही. सिंधू हिचा होणारा पती

पी.व्ही. सिंधू 22 डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये व्यंकट दत्ता साईसोबत लग्न करणार आहे. व्यंकट दत्ता हे पोसीडेक्स टेक्नोलॉजी में कार्यकारी निदेशक (एक्जीक्यूटिव डायरेक्टर) आहेत.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.