AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मितालीने धमकी देऊन ब्लॅकमेल केलं : रमेश पोवार

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमची सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार आणि सदस्य डायना एडलजी हे आपली कारकीर्द संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करणारे पत्र बीसीसीआयला लिहले होते. त्यावर आता प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीवर पलटवार केला आहे. त्यांनी बीसीसीआयला एक रिपोर्ट पाठवला, यामध्ये मिताली राजवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तिच्यावर टीममध्ये फूट पाडणे, प्रशिक्षकांवर दबाव आणणे तसेच ब्लॅकमेल […]

मितालीने धमकी देऊन ब्लॅकमेल केलं : रमेश पोवार
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमची सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार आणि सदस्य डायना एडलजी हे आपली कारकीर्द संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करणारे पत्र बीसीसीआयला लिहले होते. त्यावर आता प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीवर पलटवार केला आहे. त्यांनी बीसीसीआयला एक रिपोर्ट पाठवला, यामध्ये मिताली राजवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तिच्यावर टीममध्ये फूट पाडणे, प्रशिक्षकांवर दबाव आणणे तसेच ब्लॅकमेल करण्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रमेश पोवार यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि जनरल मॅनेजर सबा करीम यांना पाठवलेल्या 10 पानी रिपोर्टमध्ये हे आरोप केले. या रिपोर्टमध्ये पोवार यांनी टीमच्या प्रत्येक खेळाडूबाबत आपला रिपोर्ट दिला, पण त्यांचा अर्ध्याहून जास्त रिपोर्ट मिताली राजवर होता.

मिताली राजला नुकत्याच झालेल्या महिला टी-20 विश्व चषक स्पर्धेत इंग्लड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीमच्या बाहेर बसवण्यात आले होते. त्यावर मितालीने बीसीसीआयला पत्र लिहत सदस्य डायना एडलजी आणि प्रशिक्षक रमेश पवार यांच्यावर ताशेरे ओढले.

“बीसीसीआयमधील काही शक्तिशाली माणसं माझी कारकीर्द संपवण्याचे प्रयत्न करत आहेत”, असा आरोप मितालीने या पत्रातून केला.

मितालीच्या या पत्राने क्रिकेटविश्वात खळबळ माजली. यानंनतर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी बीसीसीआयला 10 पानी रिपोर्ट सादर केला.

रमेश पोवार यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले, मितालीने टीमच्या आधी स्वत:चं हित साधणे बंद करायला हवे. मला आशा आहे की, ती यावर विचार करेल आणि भारतीय महिला क्रिकेट टीमच्या हितासाठी काम करेल. तिने तिच्या खासगी कारणांसाठी फलंदाजी केली, म्हणून फलंदाजीत फ्लो येऊ शकला नाही. त्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव आला. पाकिस्तान विरोधातील मॅचमध्ये टूर सिलेक्टरच्या दबावामुळे तिला खेळाची सुरुवात करु दिली. जर तिला खेळाची सुरुवात करु दिली नाही तर परत जाईल, अशी धमकी  मिताली राज देत असल्याचही पोवार यांनी सांगितलं. तरी तिने सहा ते पंधराव्या ओव्हर दरम्यान 24 चेंडूंवर केवळ 25 धावा केल्या. आयरलँडसारख्या टीम विरोधातही मितालीने 56 चेंडूंवर 51 धावा केल्या.

पाकिस्तानच्या मॅचनंतर तिची वागणूक बदलली, तिने काही खेळाडूंना सोबत घेत आपला एक ग्रुप बनवला आणि टीमपासून दूर बसू लागली. मितालीसारखी सिनीअर खेळाडू टीमला दोन ग्रुपमध्ये फूट पाडत होती, हे बघून मला अत्यंत वाईट वाटत होतं, असेही पोवार म्हणाले.

पोवार यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, ग्रुपमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये खाली आल्यावर टीम मिटिंगमध्ये सिनीअर खेळाडू असूनही मितालीने कुठलेही सजेशन दिले नाही. ती टीम योजनेनुसार स्वत:मध्ये बदल करु शकली नाही. ती स्वत:च्या हिताकरिता खेळली. अभ्यासादरम्यान गतीने धावा बनवण्यासाठी तिला संघर्ष करावा लागत होता. तिला वाकण्यात तसेच स्ट्रोक खेळण्यात समस्या येत होती. म्हणून आम्ही तानिया भाटियाकडून खेळाची सुरुवात केली. न्यूझीलंड विरोधात तानिया आणि हेमलताचा पावर प्लेमध्ये उपयोग केला.

आता रमेश पोवार यांच्या या रिपोर्टवर बीसीसीआय काय निर्णय घेणार, त्याचा मिताली राजच्या क्रिकेट करिअरवर काय परिणाम होणार, तसेच याचा भारतीय महिला क्रिकेट टीमवर काय परिणाम होईल याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.