पॉन्टिंग टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू शकतो का? गांगुली म्हणतो....

मुंबई : आयपीएलमधील (IPL 2019) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ही श्रेयस अय्यरची टीम मेंटॉर सौरभ गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल सध्या गुणतालिकेत टॉपवर आहे. तरुण खेळाडूंचा संघ असलेल्या दिल्ली कॅपिटलच्या प्रशिक्षकपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग सांभाळत आहे. शिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करत आहे. अशावेळी …

Ricky Ponting can be a great candidate for India coach: Sourav Ganguly, पॉन्टिंग टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू शकतो का? गांगुली म्हणतो….

मुंबई : आयपीएलमधील (IPL 2019) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ही श्रेयस अय्यरची टीम मेंटॉर सौरभ गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल सध्या गुणतालिकेत टॉपवर आहे. तरुण खेळाडूंचा संघ असलेल्या दिल्ली कॅपिटलच्या प्रशिक्षकपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग सांभाळत आहे. शिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करत आहे.

अशावेळी सौरव गांगुलीने टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक म्हणून रिकी पॉन्टिंग तगडा दावेदार असल्याचं म्हटलं आहे. एका कोचमध्ये असणारे सर्व गुण पॉन्टिंगमध्ये आहेत, असं गांगुलीचं म्हणणं आहे.

आयपीएलमध्ये 2012 नंतर दिल्ली कॅपिटलचा संघ पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर टाईम्स ऑफ इंडियाने गांगुलीशी विविध मुद्द्यांवर बातचीत केली.

पॉन्टिंग टीम इंडियाचा कोच बनू शकतो का असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला. त्यावर गांगुली म्हणाला, “जर तुम्ही गुणवत्तेबाबत बोलत असाल तर निश्चितच तो एक प्रबळ दावेदार आहे. मात्र पॉन्टिंगला त्याबाबत विचारावं लागेल की, तो 8-9 महिने घरापासून दूर राहू शकेल का?”

सचिन आणि लक्ष्मणसह गांगुलीही सल्लागार समितीचा सदस्य आहे. हीच समिती टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड करते. सध्या टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा रवी शास्त्री सांभाळत आहेत. त्यांचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपणार होता, मात्र तो वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, गांगुलीला पॉन्टिंगसोबत काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला. त्यावर गांगुली म्हणाला, आम्ही क्रिकेट खेळत होतो, त्यावेळी एकमेकांचे विरोधक होतो. मात्र आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत. गेल्या काही वर्षात आमचं नातं अधिक सदृढ झालं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *