VIDEO : चेंडू इतक्या जोरात टाकाली की, डायरेक्ट स्टम्पचे दोन तुकडे, या गोलंदाजाच्या कारनाम्याने सगळेच हैराण
Vitality Blast मध्ये 8 जुलै रोजी समरसेट आणि एसेक्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये समरसेटकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज राइली मेरेडिथने आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवली.

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अशा गोष्टी होतात, ज्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. इंग्लंडमध्ये 8 जुलै रोजी असच पहायला मिळालं. जेव्हा एका वेगवान गोलंदाजाने स्टम्पचे दोन तुकडे केले. हे सहसा अस पहायला मिळत नाही. विकेट जेव्हा तुटते, त्यावेळी खेळपट्टीला तडे जातात. पण यावेळी वेगवान गोलंदाजाने मधूनच स्टम्पचे दोन तुकडे केले. इंग्लंडमध्ये Vitality Blast स्पर्धेत ही घटना घडली.
Vitality Blast मध्ये 8 जुलै रोजी समरसेट आणि एसेक्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये समरसेटकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज राइली मेरेडिथने आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवली. मॅचमध्ये मेरेडिथने पहिला विकेट असा घेतला, सगळेच हैराण झाले. एसेक्सचा ओपनर मायकल पीपरला त्याने बाद केलं. मेरेडिथने पीपरला बोल्ड केलं, तेव्हा जे दृश्य होतं, ते पाहून सगळेच हैराण झाले. असं होण सुद्धा स्वाभाविक होतं. कारण क्रिकेटच्या मैदानात कदाचित पहिल्यांदा असं पहायला मिळालं असेल.
जणू स्टम्प कोणी मधूनच कापला
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता स्टम्पची काय स्थिती झाली. चेंडू स्टम्पला धडकल्यानंतर स्टम्पचे दोन तुकडे झाले. जणू स्टम्प कोणी मधूनच कापला असेल असं वाटावं. अनेकदा गोलंदाज फलंदाजाला क्लीन बोल्ड करतात. पण हे एक वेगळच दृश्य होतं. राइली मेरेडिथने एसेक्सचा ओपनर मायकल पीपरला 13 रन्सवर बाद केलं. त्यानंतर चार्ली एलींसनचा आणखी एक विकेट त्याने घेतला. राइली मेरेडिथने 2 ओव्हरमध्ये 22 धावात दोन विकेट काढले.
View this post on Instagram
या मॅचचा निकाल काय लागला?
या मॅचमध्ये समरसेटने पहिली फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 225 धावा केल्या. या टॉम कोहलरची भूमिका महत्त्वाची होती. त्याने 39 चेंडूत 90 धावा केल्या. एसेक्स समोर 226 धावांच लक्ष्य होतं. पण त्यांची टीम 130 रन्सवर ऑलआऊट झाली. मॅट हेनरीने 4 ओव्हरमध्ये 21 रन्स देऊन चार विकेट काढले. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अशा गोष्टी घडत असतात. आतापर्यंत अनेकदा अद्भूत कॅच आणि फटक्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत.
