5

रिषभ पंतच्या चुकीमुळे सलग दोन षटकार ठोकले : धोनी

चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नईने शानदार विजय मिळवला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपण सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर असल्याचं दाखवून दिलं. दुखापतीनंतर पुनरागमन करत धोनीने फलंदाजी आणि यष्टीरक्षणातून त्याची कामगिरी दाखवून दिली. वेगवान फलंदाजी करत धोनीने 22 चेंडूत 44 धावा केल्या, ज्यात अखेरच्या षटकातील दोन षटकारांचाही समावेश आहे. धोनीला […]

रिषभ पंतच्या चुकीमुळे सलग दोन षटकार ठोकले : धोनी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नईने शानदार विजय मिळवला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपण सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर असल्याचं दाखवून दिलं. दुखापतीनंतर पुनरागमन करत धोनीने फलंदाजी आणि यष्टीरक्षणातून त्याची कामगिरी दाखवून दिली. वेगवान फलंदाजी करत धोनीने 22 चेंडूत 44 धावा केल्या, ज्यात अखेरच्या षटकातील दोन षटकारांचाही समावेश आहे.

धोनीला दोन षटकारांबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्याने याचं कारणही सांगितलं. यष्टीरक्षण करत असलेल्या रिषभ पंतच्या चुकीमुळे दोन षटकार लगावता आले, असं तो म्हणाला. षटकार ठोकण्यासाठी एक धाव घेण्याची जोखीम का घेतली, असा प्रश्न समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला विचारला, ज्यावर त्याने मजेशीर उत्तर दिलं.

अंबाती रायुडू नेमकाच फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे मोठे फटकार मारणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. पण इथे पंतने माझी मदत केली. त्याने ग्लब्स काढलेले नव्हते, म्हणून मला एक धाव घेता आली आणि मी स्ट्राईकवर गेलो. धोनीने अप्रत्यक्षपणे रिषभ पंतला सल्लाही दिला. अखेरच्या षटकामध्येही पंतने ग्लब्स घातलेले होते, ज्यामुळे एक धाव घेण्याची जोखीम स्वीकारता आली.

धोनी यष्टीरक्षण करताना अखेरच्या षटकांमध्ये एकाच हातात ग्लब्स घालतो, ज्यामुळे फलंदाजाला धावबाद करणं धोनीसाठी सोपं जातं. पण पंतने दोन्हीही हातात ग्लब्स घालून ठेवले आणि धोनी स्ट्राईकवर आला. अखेरच्या दोन्ही चेंडूवर धोनीने षटकार ठोकले आणि पंतला त्याची चूक लक्षात आणूल दिली. छोट्या गोष्टींवर लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटने शिकू शकता. यानंतरही तुम्हाला मूलभूत गोष्टी योग्य पद्धतीने कराव्या लागतील. पण तुम्ही तिथेच अडकून राहिले तर चुका करत राहता. मूळ गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे, असं धोनी म्हणाला.

अखेरच्या षटकापूर्वी चेन्नईची धावसंख्या 164 होती. तीन चेंडूनंतर धोनीने जोखीम घेत एक धाव घेतली आणि स्ट्राईकर गेला. रायुडू तेव्हा नेमकाच फलंदाजीसाठी आला होता. ट्रेंट बोल्टने चौथा चेंडू वाईड फेकला. इथेच धोनीने त्याचं कौशल्य दाखवलं आणि एक धाव घेतली. पंतकडून धोनीला बाद करण्याची संधी हुकली. यानंतरच्या दोन्ही चेंडूंवर षटकार ठोकत धोनीने धावसंख्या 179 वर नेली.

VIDEO : धोनीच्या वेगवान 44 धावा

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?