लाज वाटली पाहिजे तुला… ई सिगारेट पिणाऱ्या रियानला नेटकऱ्यांनी झापलं, प्रचंड संताप
पंजाब किंग्जविरुद्धचा सामना सुरू असताना, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग हा ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहते संतप्त झाले आणि त्यामुळे बीसीसीआयला जाब विचारण्यात आला आहे. चाहत्यांनी रियानवर जोरदार टीकाही केली आहे.

इंडिय़न प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2026) मंगळवारी मोठा विजय मिळवूनही राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ आणि कर्णधार रियान पराग (Riyan Parag) हे दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, राजस्थानचा कर्णधार रियान पराग हा ड्रेसिंग रूममध्ये बसून ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला, तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गदारोळ झाला.
काल, म्हणजेच 28 एप्रिल रोजी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या 16 व्या षटकादरम्यान, कॅमेरा ड्रेसिंग रूमकडे वळला, पण तिथे बसलेला पराग हा व्हेपिंग करताना, ई-सिगारेट ओढताना दिसला. त्याच्या शेजारी उभा असलेला यशस्वी जयस्वाल मैदानाकडे बोट दाखवत होता.
His 15-year-old teammate is more mature.. #riyanparag is captain of a #IPL franchise and doesn’t know or cares about the rules. pic.twitter.com/JXTnglwgAV
— Jatin Sharma (@jatincricket) April 28, 2026
भारतात बंदी
खरंतर इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 अन्वये, भारतात ई-सिगारेट आणि व्हेपिंग उपकरणांवर कठोर बंदी आहे. याशिवाय, स्टेडियम आणि ड्रेसिंग रूममध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई असते. त्यामुळे, एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि कर्णधार असलेल्या रियान परागचे हे वर्तन गंभीर मानले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय हे प्रकरण हलक्यात घेणार नाही. त्यामुळे ई-सिगारेट ओढणाऱ्या रियान परागवर दंड किंवा इतर कठोर कारवाई होऊ शकते. यापूर्वी, राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांना पीएमओए (खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्र) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.
कालच्या मॅचबद्दल सांगायचं झालं तर 223 धावांचं हे मोठं आव्हान राजस्थानने 6 गडी राखून पूर्ण केलं आणि पंजाबची विजयी विजयी मालिका संपुष्टात आणली. यशस्वी जैस्वाल आणि डोनोव्हन फरेरा यांनी अर्धशतकं झळकावली, तर परागने 16 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या. तो युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, सामन्यानंतर विजयापेक्षा परागभोवतीचा वादच अधिक चर्चेत राहिला.
सोशल मीडियावर यूजर्स नाराज
ई-सिगारेट ओढताना रियान पराग दिसल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सनी, त्याच्यावर जोरदार टीका केली, अनेकांनी याला “लाजिरवाणे नेतृत्व” म्हटलं, तर काहींनी बीसीसीआयकडे, कठोर कारवाईची मागणी केली.
DISGRACEFUL LEADERSHIP: RIYAN PARAG EXPOSED 🚨
Is this how an IPL captain behaves? Riyan Parag caught vaping on live TV inside the dressing room during the RR vs PBKS match.
You have a 15-year-old wonderkid like Vaibhav Suryavanshi in the same dugout.
Smoking in the dressing… pic.twitter.com/89W7kJv9BL— Cricket Central (@CricketCentrl) April 28, 2026
Rajasthan Royals Captain Riyan Parag caught #VAPING inside the team dressing room during the #PBKS clash at #MULLANPUR Chandigarh tonight.
Remember this #VAPING BAN in India.
So now we wait BCCI or IPL authorities take any action against #RiyanParag?#PBKSvRR #IPL2026 pic.twitter.com/h66XTKyYkR— sports news (@CricUniverse7) April 28, 2026
Rajasthan Royals Captain Riyan Parag caught #VAPING inside the team dressing room during the #PBKS clash at #MULLANPUR Chandigarh tonight.
Remember this #VAPING BAN in India.
So now we wait BCCI or IPL authorities take any action against #RiyanParag?#PBKSvRR #IPL2026 pic.twitter.com/h66XTKyYkR— sports news (@CricUniverse7) April 28, 2026
Riyan parag was caught vaping in dressing room ,how it’s allowed inside dressing room bcci whats happening pic.twitter.com/BsYHuunBuj
— cherry_gems (@Introvert2core) April 28, 2026
🚨BEYOND RECKLESS: RR CAPTAIN RIYAN PARAG CAUGHT VAPING ON LIVE TV🚨
Riyan Parag being caught vaping in the dressing room while serving as RR Captain is a wild lack of discipline. You’re leading a team of youngsters like Vaibhav Suryavanshi, Jaiswal, and Jurel, and you’re doing… pic.twitter.com/RAqLZcC0bH
— LUCK7773 (@Luck_7773) April 28, 2026
जेव्हा संघात तरुण खेळाडूंचा भरणा आहे, तेव्हा कर्णधाराचे असे वर्तन एक वाईट उदाहरण म्हणून दिसतं असा मुद्दाही अनेकांनी उपस्थित केला. रियान परागचे व्हेपिंग प्रकरण समोर येताच सोशल मीडियावर मोठा गदारोळ उसळला. चाहत्यांनी कर्णधाराच्या जबाबदारीवर आणि त्याच्या वागण्यावर, दोन्हींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.