148 KMPH वेगाच्या बॉलचा उजव्या हातावर फटका, रोहित शर्मा मैदानावर वेदनेने व्हिव्हळला

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यात पहिल्या एकदिवस सामन्यादरम्यान  (India vs England 2021 1st odi)  हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला (Rohit Sharma injury on Mark Wood ball).

148 KMPH वेगाच्या बॉलचा उजव्या हातावर फटका, रोहित शर्मा मैदानावर वेदनेने व्हिव्हळला
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 6:11 PM

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यात पहिल्या एकदिवस सामन्यादरम्यान  (India vs England 2021 1st odi)  हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला. भारताची फलंदाजी सुरु असताना पाचव्या ओव्हरमध्ये एक अनपेक्षित घटना घडली. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वुडचा एक बॉल थेट रोहित शर्माच्या उजव्या हातावर बसला. त्यामुळे रोहित शर्मा जागेवरच व्हिव्हळला. त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने फिजिओ थेरपीस्टची मदत घ्यावी लागली. सुदैवाने जखम मोठी नव्हती. मात्र, त्यापासून होणारा त्रास रोहितच्या चेहऱ्यावर दिसत होता. फिजिओ थेरपीस्टच्या उपचारानंतर रोहितने पुन्हा खेळायला सुरुवात केली. दरम्यान, जखमी झाल्यानंतर रोहित मैदानावर जास्त वेळ तग धरु शकला नाही. अवघ्या 28 धावांवर तो बाद झाला (Rohit Sharma injury on Mark Wood ball).

148 किलोमीटर प्रतितास वेगाचा बॉल हाताला लागला

रोहित शर्मा मार्क वूडच्या (Mark Wood) बॉलवर जखमी झाला. हा बॉल जवळपास 148 किलोमीटर प्रतितास वेगाचा होता. बॉलचा टप्पा पडताच रोहितने त्याला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बॉल रोहितच्या अंदाजापेक्षा जास्त उंचावर उसळला. त्यामुळे तो बॉल थेट रोहितच्या उजव्या हातावर बसला. हातावर चेंडू पडताच रोहित जागेवर वेदनांनी व्हिव्हळला. त्यानंतर फिजिओ थेरपीस्टला बोलवावं लागलं. उपचारानंतर तो पुन्हा खेळू लागला (Rohit Sharma injury on Mark Wood ball).

धवनसोबत 64 धावांची भागीदारी

विशेष म्हणजे जखमी झाल्यानंतरही रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर देण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याने 42 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. पण 16 व्या षटकात बेन स्टोक्सच्या बॉलवर तो बाद झाला. बेन स्टोक्सच्या बॉलला प्रतिकार करत असताना बॉल बॅटला टच होऊन थेट क्षेत्ररक्षण करणाऱ्या जोस बटलरच्या हातात गेला. मात्र, तरीही बाद होण्याआधी त्याने शिखर धवन सोबत 64 धावांची भागीदारी केली.

वर्षभरानंतर वनडे खेळण्यासाठी मैदानात

महत्त्वाचं म्हणजे रोहित वर्षभरानंतर वन डे खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्याआधी त्याने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलिया विरोधात एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने चक्क 119 धावा करुन भारताला विजय मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर जखमी झाल्याने रोहित शर्मा एकही एकदिवसीय सामना खेळू शकला नाही. रोहित जखमेमुळेच न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीममधून बाहेर होता.

संबंधित बातमी : गब्बरचं शतक हुकलं, शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.