Rohit Sharma Celebration: शतकानंतर जम्पिंग सेलिब्रेशनच का? रोहित म्हणाला, काही गोष्टी माझ्यासोबत…

Rohit Sharma Century Celebration Video: रोहित शर्माने काल वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात शतक झळकावले. या शतकापेक्षा त्याच्या शतकी खेळीनंतरच्या सेलिब्रेशनची जास्त चर्चा रंगली. आता हे सेलिब्रेसन हिटमॅनने का केलं यामागचे त्याने कारण स्पष्ट बोलून दाखवले आहे.

Rohit Sharma Celebration: शतकानंतर जम्पिंग सेलिब्रेशनच का? रोहित म्हणाला, काही गोष्टी माझ्यासोबत...
| Updated on: Oct 01, 2026 | 8:23 AM

Rohit Sharma : भारताचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध गुवाहाटी येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात १०१ धावांची शानदार खेळी केली. हे त्याचे ३५ वे एकदिवसीय शतक होते. मात्र, सामन्यानंतर त्याने केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनने त्याच्या फलंदाजीपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले. शतक पूर्ण केल्यानंतर रोहितने एका अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. एक धाव घेताना तो नॉन-स्ट्रायकरच्या टोकाकडे उडी मारून गेला. रोहितचा असा अंदाज पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याने चाहतेही खुश झाले. आता या सेलिब्रेशनमागे काय कारण हेते हे त्याने स्पष्ट केले आहे.

सामन्यानंतरच्या मुलाखतीत याबद्दल विचारले असता, तो हसून म्हणाला, “ते सेलिब्रेशन फक्त माझ्यासाठी होते. काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला स्वतःपुरत्याच ठेवायच्या असतात आणि त्या इतर कोणाशीही शेअर करायच्या नसतात. त्यामुळे ते सेलिब्रेशन फक्त माझ्यासाठी होते.”

Loading...

४०६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित आणि शुभमन गिलने भारताला एक चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी २५५ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे भारताच्या बाजूने पालटले. रोहित म्हणाला की, मी आणि गिल धावफलकाचा फारसा विचार करत नव्हतो. मला वाटतं खेळपट्टी चांगली होती. आम्हाला फक्त फलंदाजी सुरू ठेवायची होती. आम्ही धावफलकाचा फारसा विचार करत नव्हतो. आम्ही फक्त चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळण्याचा आणि भागीदारी उभारण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा तुम्ही अशा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असतो, तेव्हा तुम्हाला मोठ्या भागीदारींची गरज असते. गिल अप्रतिम खेळला; संपूर्ण डावात त्याच्या फलंदाजीवर त्याचे जबरदस्त नियंत्रण होते.”

उष्णतेत फलंदाजी करणे हे एक मोठे आव्हान असल्याचे सांगत, रोहित शर्माने कबूल केले की पहिल्या डावात बराच वेळ क्षेत्ररक्षण केल्यानंतर फलंदाजी करणे सोपे नव्हते. रोहित म्हणाला, “तुम्हाला तुमची विकेट गमवायची नाहीये याची स्वतःला सतत आठवण करून द्यावी लागते, कारण इथली परिस्थिती कठीण आहे. इथेच मला माझ्या अनेक वर्षांच्या खेळाचा अनुभव वापरायचा होता. तुम्हाला इतक्या सहजपणे विकेट गमावायची नसते, तर शक्य तितके खेळात टिकून राहण्याचा प्रयत्न करायचा असतो. आम्हाला माहित होते की खेळपट्टी चांगली आहे आणि वरच्या फळीतील फलंदाजांकडून मोठ्या धावसंख्येची गरज आहे, आणि नेमके तेच घडले. आमच्या डावाच्या सुरुवातीला एक खूप चांगली भागीदारी झाली आणि त्यामुळेच आमचा विजय निश्चित झाला.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us