Sachin Tendulkar Birthday : कमाईमध्ये सचिन अजूनही हिट… मुंबई ते लंडनपर्यंत घरं, जाणून घ्या मास्टर ब्लास्टरची संपत्ती किती ?

क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस. 24 अप्रैल 1973 साली त्याचा जन्म मुंबईत झाला. आज आपला सचिन 51 वर्षांचा झालाय. सचिनचे जगात लाखो चाहते आहेत. क्रिकेट म्हटलं की त्याचं नाव हमखास ओठांवर येतंच. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने दिलेलं योगदान कोणालाच विसरता येणार नाही

Sachin Tendulkar Birthday : कमाईमध्ये सचिन अजूनही हिट... मुंबई ते लंडनपर्यंत घरं, जाणून घ्या मास्टर ब्लास्टरची संपत्ती किती  ?
मास्टर ब्लास्टरची संपत्ती किती ?
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 10:33 AM

क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस. 24 अप्रैल 1973 साली त्याचा जन्म मुंबईत झाला. आज आपला सचिन 51 वर्षांचा झालाय. सचिनचे जगात लाखो चाहते आहेत. क्रिकेट म्हटलं की त्याचं नाव हमखास ओठांवर येतंच. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने दिलेलं योगदान कोणालाच विसरता येणार नाही. 100 शतके आणि 200 कसोटी सामने खेळणारा जगातील एकमेव खेळाडू हा खरंच क्रिकेटचा देव आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे रेकॉर्ड बनवण्यासोबतच सचिनने खूप कमाई देखील केली आहे. आणि आता निवृत्त झाल्यानंतरही तो दर महिन्याला करोडोंची कमाई करतोय. त्याचे नेटवर्थ किती आहे आणि सचिन कोणत्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो हे जाणून घेऊया…

क्रिकेट रेकॉर्डच नव्हे , भरपूर कमाईदेखील केली

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी हातात बॅट धरून एकापाठोपाठ एक मोठे विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. आता तो 51 वर्षांचा आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकीकडे त्याने तूफान खेळी करत मोठमोठे विक्रम केले तर दुसरीकडे भरपूर पैसेही कमावले. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश होतो. रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी, 2023 पर्यंत सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 175 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1436 कोटी रुपये होती. विशेष म्हणजे त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी जाहिराती आणि इतर माध्यमातून तो करोडो रुपये कमावतो आहे.

हे सुद्धा वाचा

या मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींमधून मिळतो पैसा

सचिन तेंडुलकरने भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण मोठमोठे ब्रँड्स अजूनही त्याच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणूनच या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये सचिन सर्वात जास्त दिसतो. Boost, Unacademy, Castrol India, BMW, Luminous India, Sunfeast, MRF tyres, Aviva Insurance, Pepsi, Adidas, Visa, Luminous, Sanyo, BPL, Philips, Spinny सारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये सचिन दिसतो. ब्रँड एंडॉर्समेंटमधून तो दरवर्षी 20 ते 22 कोटी रुपये कमावतो.

बिझनेस सेक्टरमध्येही ठेवलं पाऊल

सचिन तेंडुलकर ब्रँड एंडॉर्समेंटसह व्यावसायिक क्षेत्रातही प्रसिद्ध असून त्याचा कपड्यांचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचा ब्रँड ट्रू ब्लू (true blue) हा अरविंद फॅशन ब्रँड्स लिमिटेडसह एक जॉईंट व्हेंचर आहे. हे 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते. 2019 मध्ये, ट्रू ब्लू हा अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लॉन्च करण्यात आला. याशिवाय सचिन तेंडुलकर रेस्टॉरंट व्यवसायातही सक्रिय आहे. मुंबई आणि बेंगळुरूमध्ये सचिन आणि तेंडुलकरर्स अशी रेस्टॉरंट आहेत.

मुंबई ते केरळ… आलिशान घरांचा मालक आहे सचिन

सचिन तेंडुलकरचे राहणीमान आलिशान आहे, ते त्याची आलिशान घरे पाहूनही कळू शकते. मुंबईतील वांद्रे येथील पॉश भागात त्याचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. 2007 मध्ये त्याने हे घर सुमारे 40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. केवळ मुंबईतच नाही तर केरळमध्येही त्याचा करोडोंचा बंगला आहे. तसेच मुंबईतील वांद्रे येथील कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. ब्रिटनमधील लंडनमध्येही त्याचे स्वतःचे घर असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

महागड्या कारचाही आहे शौक

सचिन तेंडुलकरलाही गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अप्रतिम गाड्या आहेत. रिपोर्टनुसार, त्याच्या कलेक्शनमध्ये एकाहून एक सरस अशा अनेक कार आहेत. यामध्ये Ferrari 360 Moden, BMW i8, BMW 7 Series, 750Li M Sport, Nissan GT-R, Audi Q7, BMW M6 Gran Coupe आणि BMW M5 30 Jahre यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.