सानियाने लग्नाआधी किती पुरुषांना केलंय डेट… युवराज सिंह पासून शाहिद कपूर पर्यंत…. जाणून व्हाल थक्क

Sania Mirza Dating History: लग्नाआधी देखील सानिया मिर्झाने केलंय अनेक श्रीमंत पुरुषांना डेट... युवराज सिंह आणि शाहिद कपूर यांच्यासोबत प्रेमसंबंध, तिच्या पुरुषाबद्दल जाणून व्हाल थक्क

सानियाने लग्नाआधी किती पुरुषांना केलंय डेट... युवराज सिंह पासून शाहिद कपूर पर्यंत.... जाणून व्हाल थक्क
Sania Mirza
| Updated on: Nov 26, 2025 | 9:59 AM

Sania Mirza Dating History: माजी टेनिस खेळाडू सानिया मिर्झा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. 2024 मध्ये सानिया मिर्झा आणि पाकिस्ताना क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या 14 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सानिया सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे… सोशल मीडियावर सानिया कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते… पण सानिया हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाआधी देखील सानिया हिने अनेकांना डेट केलं आहे. पण कोणासोबत सानियाचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही..

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचं 2024 पर्यंत 14 वर्षे लग्न झालं होतं, परंतु 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्याआधी सानिया कोणाला डेट करत होती याबद्दल जाणून घेऊ… माजी क्रिकेटर युवराज सिंह आणि शाहिद कपूर यांच्यासोबत देखील सानिया हिच्या नावाच्या चर्चा रंगल्या.

अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत सानिया मिर्झा हिचं नाव जोडण्यात आलं. 2008 मध्ये सानिया आणि शाहिद यांच्या नावाची चर्चा रंगली होती. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्याची स्वीकार सर्वांसमोर केला नाही.

त्यानंतर भारतीय टेनिस स्टारचं तिच्या बालपणीच्या मित्र सोहराबशी नाव जोडलं गेलं. पण जुलै 2009 मध्ये हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलमध्ये दोघांनी साखरपुडाही केला, परंतु लग्न कधीच झालं नाही.

सानिया मिर्झा आणि महेश भुपती याचं देखील नाव जोडण्यात आलं. दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या होत्या. पण रिपोर्ट्सनुसार, लंडन ऑलिंपिकच्या अगदी आधी असं काही घडलं, ज्यामुळे दोघांनी निभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भूपतीने ऑलिंपिकसाठी रोहन बोपण्णाला आपला जोडीदार म्हणून निवडलं.

2010 मध्ये तिच्या लग्नाच्या काही काळापूर्वी, सानिया मिर्झा एका कार्यक्रमात भारतीय अष्टपैलू युवराज सिंहसोबत पार्टी करताना दिसली. कार्यक्रमातील दोघांचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले आणि दोघांच्या डेटिंगबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या.

सानिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील सानिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील सानिया हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यात राहण्यासाठी सानिया कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us