सानिया मिर्झा हिचे घटस्फोटानंतर अत्यंत मोठे विधान, म्हणाली, त्याला सोडणे सर्वात…

सानिया मिर्झाने शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतला. मात्र, या घटस्फोटानंतर ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे टाळताना दिसली. घटस्फोटाला काही महिने पूर्ण होत असतानाच ती खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे.

सानिया मिर्झा हिचे घटस्फोटानंतर अत्यंत मोठे विधान, म्हणाली, त्याला सोडणे सर्वात...
Sania Mirza
Updated on: Nov 24, 2025 | 9:42 AM

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेतला. तिने सुरूवातीचे काही दिवस घटस्फोटावर भाष्य करणे टाळले. आता ती घटस्फोटाबद्दल जाहीरपणे बोलत आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न करत थेट तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि एकच खळबळ उडाली. सानिया आणि शोएबचा एक मुलगा असून सानियाच त्याचा सांभाळ करते. काही दिवसांपूर्वी एक मुलाखत शोएबने दिली. त्या मुलाखतीमध्ये तो म्हणत होता की, तो एका महिन्यातील त्या तारखेची वाट बघतो, ज्यादिवशी तो त्याच्या मुलाला भेटतो. मुलासोबत खास वेळ घालवणे त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणांपैकी एक आहे. हेच नाही तर मुलासोबत असलेल्या नात्याबद्गलही बोलताना तो दिसला.

शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा दुबई सोडेल असे सांगितले जात होते. मात्र, सानिया मिर्झाने दुबई सोडली नसून ती दुबईतच आहे. नुकताच आता सानियाने अत्यंत मोठा खुलासा केला. सानिया म्हणाली की, कामानिमित्त मला भारतात जावे लागते. त्याला सोडून जाणे खूप जास्त कठीण होते. सानिया हे तिच्या मुलाबद्दल बोलत होती. सानियाचा मुलगा दुबईतच शिकतो. त्याच्या क्लासेस शाळा सर्वकाही दुबईत आहे.

सानियाला महिन्यातून अनेकदा दुबईहून भारतात यावे लागते. मग अशावेळी सिंगल पालक असल्याने सानिया भारतात आल्यानंतर मुलासोबत ती नसते. मुलाला दुबईत सोडून भारतात येणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण क्षण असल्याचेही सानियाने म्हटले. सिंगल पालक असल्यानंतर काय काय गोष्टींना सामोरे जावे लागते, हे सांगतानाही सानिया मिर्झा दिसली आहे. काही गोष्टी आपल्याला कॅमेऱ्यापुढे बोलायच्या नसल्याचे सानिया मिर्झा हिने तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना म्हटले.

काही दिवसांपूर्वीच सानियाने आपल्या लेकाचा वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केला. सानियाचे काही मित्र मैत्रिण देखील यादरम्यान उपस्थित होते. शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सानिया आपल्या मुलासोबत तिच्या दुबईतील घरी राहते. महिन्यातून एकदा शोएब मलिक आपल्या मुलाला भेटण्यासाठी येतो. यावेळी त्याला क्लासला सोडणे शाळेमध्ये घ्यायला जाणे अशी तो सर्व कामे करतो.