सचिन तेंडुलकरच्या सासूबाईंना पाहिलेत का? सारा तेंडुलकर पडेल फिकी; देसी लुक व्हायरल!

नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमाला सारा तेंडुलकर ही आजी अॅनाबेलासोबत गेली होती. या कार्यक्रमात दोघींनी मॅचिंग कपडे घातले होते. त्यांचा बाँड पाहून सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

सचिन तेंडुलकरच्या सासूबाईंना पाहिलेत का? सारा तेंडुलकर पडेल फिकी; देसी लुक व्हायरल!
Sara tendulkar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 23, 2025 | 5:36 PM

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची लेक आजकाल सतत चर्चेत असते. तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. साराने अद्याप चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेले नाही. मात्र, ती कायमच लाइमलाइटमध्ये असते. ती कुठेही गेली तरी फोटोग्राफर्स तिला फॉलो करताना दिसतात. साराचा लूक देखील नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. पण सध्या साराचा तिच्या आजीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

साराने नुकतीच ग्लोबल पीस ऑनर्स २०२५ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात ती देसी लूकमध्ये आली होती. तिने सोनेरी रंगाचा पंजाबी ड्रेस टाइप सूट घातला होता. सिंपल मेकअप, मोकळे केस, या लूकमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे. सारासोबत तिची आजी देखील आहे. साराने आजीसोबत फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.

साराच्या आजीचा लूक

सारा तेंडुलकरच्या आजीचे नाव अॅनाबेल मेहता आहे. त्यांनी देखील ग्लोबल पीस ऑनर्स २०२५ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी देखील सोनेरी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तसेच साराचा हात पकडून फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली. एका क्षणासाठी साराचं सौंदर्यही त्यांच्या पुढे फिक वाटत होतं. त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर देखील अॅनाबेल मेहता यांच्या लूकची चर्चा रंगली आहे. अंजली तेंडुलकर यांची आई अॅनाबेला या 85 वर्षीय आहेत. पण त्यांच्या साधेपणाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कसलाही दिखावा न करता त्या नातीचा हात हातात घेऊन उभ्या राहिल्या. दोघींचा तो प्रेमळ बॉण्ड सगळ्यांना अतिशय आवडला आहे.

कार्यक्रमाविषयी

ग्लोबल पीस ऑनर्स २०२५ या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुटुंबासहीत या कार्यक्रमाला हजर होते. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात फोटोग्राफर्सला पोज दिल्या. पण सारा तेंडुलकर आणि आजी अॅनाबेल यांनी सर्वांचे लक्ष वेधले. दोघींनीही मॅचिंगकपडे घातले होते. दोघींच्या साध्या पण अप्रतिम देसी लुकने सगळ्यांची मन जिंकली आहेत.