AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: मोठा भाऊ बेंचवर बसूनच राहिला, तर छोट्या भावाने मात्र मैदान गाजवलं

IND vs SL Test Series: भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी सरफराज खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकाही सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही,

IND vs SL: मोठा भाऊ बेंचवर बसूनच राहिला, तर छोट्या भावाने मात्र मैदान गाजवलं
| Updated on: Aug 26, 2026 | 8:50 AM
Share

IND vs SL Test Series: भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी सरफराज खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकाही सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही, तो मैदानावर फक्त फिल्डींग करायला येतो. पण आता दुसरीकडे सर्फराज खानचा भाऊ मात्र मैदान गाजवत आहे.

मुशीर खानने दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात ९६ धावा केल्या, थोडक्यासाठी त्याचे शतक हुकले. शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची त्याला चांगली संधी होती, पण त्याच्या बाद होण्याने वेस्ट झोनच्या डावाला खीळ बसली. सामन्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, वेस्ट झोनची धावसंख्या २२०/७ आहे, आणि ते विजयापासून अजून ६७ धावा दूर आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयी संघ निश्चित होईल.

या सामन्यात वेस्ट झोनने ८४ धावांत तीन गडी गमावले, पण त्यानंतर मुशीर खान आणि ऋतुराज गायकवाड यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी करून वेस्ट झोनला सामन्यात परत आणले. या दोन फलंदाजांनी १३८ चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. गायकवाडची खेळी खूपच वेगवान होती, त्याने अवघ्या ७० चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. जर वेस्ट झोनने हा सामना जिंकला, तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना साऊथ झोनशी होईल.

सर्नराज खान अजूनही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपल्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या तो संघात फक्त फिल्डींगसाठी येत आहे. तो भारतासाठी शेवटचा ३ नोव्हेंबर २०२४ रोजी खेळला होता. तेव्हापासून तो आपल्या संधीच्या शोधात आहे. आपल्या लहान भावाप्रमाणेच सर्फराजने  ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत, पण टीम इंडियाकडून पुन्हा खेळण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे, पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला तर आता दुसरा कसोटी सामनाही जिंकण्याच्या तयारीत आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे