पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीनंतर आता शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हात पसरले, म्हणाला…

पाकिस्तानची आर्थिक स्थिती पूर्णत: डबघाईला आली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर इतर देशांकडून भीक मागण्याची वेळ आहे. आता शाहिद आफ्रिदीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं आहे.

पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीनंतर आता शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हात पसरले, म्हणाला...
"मी जेव्हा भारतात आलो होतो..", असं सांगत शाहिद आफ्रिदीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनवणी
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 3:50 PM

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मैदान युद्धाचं असो की खेळाचं कायमच आक्रमकता दिसून आली आहे. मात्र गेल्या काही वर्षात पाकिस्तानची परिस्थिती एकदम बिकट होत चालली आहे. दहशतवादामुळे जगभरातून पाकिस्तानची आर्थिक कोंडी झाली आहे.त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले आहेत. त्यात भारताच्या कणखर भूमिकेमुळे पाकिस्तानची सर्व क्षेत्रात पुरती वाट लागली आहे. पाकिस्तान क्रिकेट आणि क्रिकेटपटूंनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनवणी केली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद संपुष्टात यावा यासाठी पुढाकार घेण्याची विनंती शाहिद आफ्रिदीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेट सामने खेळता येतील.

“दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकत्र बसून पूर्ण जबाबदारीने यावर तोडगा काढावा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांसाठी प्रयत्न करावेत. तसेच दोन्ही देशांमध्ये सामने खेळण्याची पुढाकार घ्यावा”, असं शाहिद आफ्रिदीने सांगितलं.

पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास भारताने नकार दिला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पाकिस्तान जाणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतात वर्ल्डकप खेळण्यास येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाद वाढला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा द्विपक्षीय सामना 2012 मध्ये झाला होता. पाकिस्तान संघ भारतात तीन टी 20 आणि तीन वनडे सामने खेळला होता. तर भारतीय संघ 2008 मध्ये आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात आला होता.

“भारताने आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात यावं. यासाठी भारताने यासाठी पुढाकार घ्यावा. आम्हाला दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध हवे आहेत. हा काळ भांडण्याचा नाही.”, अशी विनवणी आफ्रिदीने बीसीसीआयला केली.

2005 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानात आल्याची आठवणही त्याने करून दिली. तेव्हा क्रिकेट चाहत्यांनी खेळाडूंवर प्रेमाचा वर्षाव केला होता. “मला आठवते मी भारतात आलो होतो तेव्हा लोकांनी खूप प्रेम दिलं होतं. 2005 साली भारतीय संघ पाकिस्तानात आला होता तेव्हा भज्जी आणि युवी शॉपिंगला जायचे. तेव्हा कुणीच त्यांच्याकडून पैसे घ्यायचं नहाी. हे दोन्ही देशाची खासियत आहे.”, असं शाहिद आफ्रिदीने पुढे सांगितलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.