जीव जाऊन परत येतोय… मृत्यूशी झुंज देतोय 38 वर्षाचा प्रसिद्ध क्रिकेटर; रुग्णालयातील चित्र बघवेना

अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर जादरान सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याने प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. एकेकाळी अफगाण क्रिकेटला नावारूपाला आणणाऱ्या या खेळाडूच्या आरोग्यासाठी संपूर्ण क्रिकेट विश्व प्रार्थना करत आहे. क्रिकेटपटू रशीद लतीफनेही चिंता व्यक्त केली आहे.

जीव जाऊन परत येतोय... मृत्यूशी झुंज देतोय 38 वर्षाचा प्रसिद्ध क्रिकेटर; रुग्णालयातील चित्र बघवेना
प्रसिद्ध क्रिकेटरची मृत्यूशी झुंज
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jan 16, 2026 | 8:53 AM

Afghanistan Cricketer Shapoor Zadran: त्याचं अजून वय झालेलं नाही… त्याला भरपूर जगायचं आहे. त्याच्यात जगण्याची ऊर्मी आहे. कुटुंबासोबत सुखाचा काळ घालवायचा आहे. जगभरात त्याला फिरायचं आहे. पण तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा रोजच मृत्यूशी सामना सुरू आहे. जीव जाऊन परत येतोय अशी त्याची अवस्था झाली आहे. रुग्णालयात त्याला बघण्यासाठी तोबा गर्दी झाली आहे. प्रत्येकाचे चेहरे सुकून गेले. प्रत्येक चेहऱ्यावर निराशा पसरलीय. हॉस्पिटलमधील हे चित्र बघवत नाही. आपला लाडका खेळाडू, माजी वेगवान गोलंदाज शपूर जादरान याची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे संपूर्ण अफगाणिस्तान चिंतेत आहे.

अफगाणिस्तानचं क्रिकेटच्या जगतात पदार्पण झालं होतं. त्या अत्यंत कठिण काळात शापूर जादरानने अफगाणिस्तान टीमला नावारुपाला आणण्यासाठी मोठं योगदान दिलं होतं. आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठसा उटवला होता. त्यांनी 2009मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण केलं. अफगाणिस्तानसाठी 80 सामने खेळले.

आता मृत्यूशी झुंज

शपूर जादरान सध्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. जीवनमरणाचा संघर्ष सुरू आहे. शपूर यांचे भाऊ घमाई जादरान यांनी 12 जानेवारी 2026 रोजी फेसबुकवर एक पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली होती. शपूर यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांचा ते सामना करत आहेत, असं घमाई यांनी म्हटलं होतं. तर, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपूर यांच्या पांढऱ्या पेशी अत्यंत कमी झाल्या आहेत. त्यामुळे स्थिती गंभीर झाली आहे. दरम्यान, शपूर यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती कुणीही दिलेली नाही. त्यांना नेमकं काय झालं? हे अद्याप कोणीही सांगितलेलं नाही.

पाकिस्तानी खेळाडूची पोस्ट

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफने ही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शपूर यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटच्या मैदानातील सिंह आज मृत्यूशी झुंज देत आहे. अफगाणिस्तानचे वेगवान गोलंदाज शपूर जादरान रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना आमच्या दुआंची गरज आहे. शेजारच्या देशातील या गुणवंत खेळाडूच्या प्रकृतीला स्थैर्य लाभण्याची मनोकामना करतो, असं राशिदने म्हटलं आहे.

असं होतं करिअर

शपूर यांनी आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 44 वनडे आणि 36 टी-20 सामने खेळले. या काळात त्यांनी वनडेत 43 बळी घेतले. आणि टी-20मध्ये 37 विकेट घेतले. 2015मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडच्या विरोधात अफगाणिस्तानने पहिल्यांदा विजय मिळवला होता. या विजयात शपूर यांचं योगदान मोठं होतं. त्यांनी फलदांजी करून विजय खेचून आणला होता. त्यामुळे अफगाणिस्तान संघाला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्याचबरोबर या सामन्यात त्यांनी चार बळीही टिपले होते. शपूर यांनी 2025मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. तब्बल 10 वर्ष ते अफगाणिस्तान संघासाठी खेळले होते.