AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: शार्दुल-बुमराहकडून बेन स्टोक्सला दोनदा जीवदान, मात्र तिसऱ्या संधीत बेन स्टोक्सला तंबूत पाठवले

पुढच्याच चेंडूवर स्टोक्सने पुन्हा तीच चूक केली आणि पुढे जाऊन शार्दुलच्या चेंडूवर मिडऑफवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, आधीच्या चेंडूवर झेल घेणारा कर्णधार बुमराह यावेळी सावध झाला आणि त्याने डावीकडे झेप घेत स्टोक्सचा झेल घेतला.

IND vs ENG: शार्दुल-बुमराहकडून बेन स्टोक्सला दोनदा जीवदान, मात्र तिसऱ्या संधीत बेन स्टोक्सला तंबूत पाठवले
जसप्रीत बुमराहImage Credit source: social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 03, 2022 | 7:33 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटी (Edgbaston Test)च्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी यजमान टीमला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी झटपट धावा काढत भारतीय संघावर दडपण आणले. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)ने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा एक सोपा झेल सोडल्याने हे दडपण अधिकच वाढले होते. पहिल्यांदा शार्दुल ठाकूर आणि नंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)ने बेन स्टोक्सला जीवदान दिले. शार्दुलनंतर भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहनेही असेच केले. त्यावेळी शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. मात्र, बुमराह आणि शार्दुलने लवकरच आपली चूक सुधारली. पुढच्याच चेंडूवर स्टोक्सने मिडऑफवर फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि बुमराहने चेंडू झेलून स्टोक्सला तंबूत पाठवला.

कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी झटपट धावा काढण्यास सुरुवात केली आणि 5 षटकांत 84 धावा देत संघाला 100 धावांपर्यंत नेले. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याप्रमाणे स्टोक्स आणि बेअरस्टो या जोडीने त्याच शैलीत या सामन्यातही फलंदाजी केली. नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात स्टोक्स-बेअरस्टो जोडीने पाचव्या विकेटसाठी 121 चेंडूत 179 धावांची भागीदारी केली आणि अशक्य वाटणारे लक्ष्य सहज गाठले. भारताविरुद्धही ही जोडी त्याच इराद्याने फलंदाजी करत होती आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनीही बेन स्टोक्सचे 2 झेल सोडून संघाच्या अडचणीत भर टाकली.

प्रथम शार्दुलकडून स्टोक्सला जीवदान

36 व्या ओव्हरमध्ये स्टोक्सला पहिल्यांदा जीवदान मिळाले. मोहम्मद शमी हे ओव्हर टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरने स्टोक्सचा झेल सोडला. स्टोक्सने पुढे जाऊन शमीच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटला लागला नाही आणि वरच्या काठावर आदळल्यामुळे हवेत गेला. शार्दुलही योग्य वेळी चेंडूखाली आला होता. पण, चेंडू त्याच्या बोटाला लागल्याने खाली पडला.

बुमराहने स्टोक्सचा झेल सोडला

पुढच्याच चेंडूवर बेअरस्टोने स्टोक्ससोबतची भागीदारी 50 धावांवर नेली. 2 षटकांनंतर स्टोक्सला पुन्हा जीवदान मिळाले. यावेळी गोलंदाज होता शार्दुल ठाकूर आणि स्वतः कर्णधार जसप्रीत बुमराहने झेल सोडला.

शार्दुलच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने पुढे जाऊन जोरदार फटका मारला. चेंडू थेट मिडऑफला उभ्या असलेल्या कर्णधार बुमराहकडे बुलेटच्या वेगाने गेला. पण, त्याने झेल सोडला. मात्र, टीम इंडियाचे नशीब चांगले होते आणि पुढच्याच चेंडूवर स्टोक्सने पुन्हा तीच चूक केली आणि पुढे जाऊन शार्दुलच्या चेंडूवर मिडऑफवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, आधीच्या चेंडूवर झेल घेणारा कर्णधार बुमराह यावेळी सावध झाला आणि त्याने डावीकडे झेप घेत स्टोक्सचा झेल घेतला. त्यामुळे इंग्लिश कर्णधाराचा खेळ संपला. दोनदा जीवदान देऊनही स्टोक्सला न्यूझीलंडविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटीइतकी अप्रतिम कामगिरी दाखवता आली नाही. (Shardul Bumrah gave Ben Stokes two chances but out in next ball)

Follow Us
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?