Ravindra Jadeja: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाचे शतक, जेम्स अँडरसनकडून टोमणा; वाचा काय म्हणाला टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू…

टीम इंडियाचा अष्यपैलू खेळाडी रविंद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झाली आहे. रविंद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या आठ वर्षापासून दोघांमध्ये खुन्नस सुरु आहे.

Ravindra Jadeja: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाचे शतक, जेम्स अँडरसनकडून टोमणा; वाचा काय म्हणाला टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू...
दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाचे शतक
Image Credit source: Google
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 03, 2022 | 6:39 PM

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन कसोटी सामना सुरु आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. मात्र या सामन्यादरम्यान मैदानावरील बॅटिंगसोबतच टीम इंडिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक बॅटिंगही सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)च्या खेळीबाबत जेम्स अँडरसन (James Anderson)ने एक वक्तव्य केले. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू स्वत:ला एक फलंदाज मानू लागला आहे, तो (जडेजा) आता थोडा उंच फलंदाजी करतो आणि चेंडू योग्य प्रकारे सोडतो ज्यामुळे आमच्यासाठी कठीण झाले, असा टोमणा (Tont) अंडरसनने लगावला आहे. याला जडेजाने मीडियाशी बोलताना उत्तर दिले आहे. जेव्हा धावा होतात तेव्हा प्रत्येकजण म्हणतो की तो फलंदाज झाला आहे. पण मी नेहमी जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवण्याचा प्रयत्न करतो. चांगली गोष्ट म्हणजे जेम्स अँडरसनला हे कळले की 2014 नंतर मी फलंदाजी करत आहे, मी आनंदी आहे, असे प्रत्युत्तर जडेजाने दिले आहे.

एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाच्या 104 धावा

टीम इंडियाचा अष्यपैलू खेळाडी रविंद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झाली आहे. रविंद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या आठ वर्षापासून दोघांमध्ये खुन्नस सुरु आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने 104 धावांची खेळी केली. यामुळे टीम इंडिया 416 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या दिवशी धडाकेबाज शतक ठोकले, तर ‘सर’ रवींद्र जडेजाने दुसऱ्या दिवशी शतक झळकावले. रवींद्र जडेजाने अलीकडच्या काळात फलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळी खेळली आहे. तर खेळ संपेपर्यंत इंग्लंडचा संघ 84 धावांत पाच विकेट गमावून बॅकफूटवर होता.

जडेजा-अँडरसनमध्ये 2014 पासून वाद

रवींद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन यांच्यातील लढत 8 वर्ष जुनी आहे. 2014 मध्ये झालेल्या एका टेस्ट मॅचमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यावेळी जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला धमकी दिली होती की, तो ड्रेसिंग रूममध्ये येऊन त्याचे दात तोडेल. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू आहे. (England bowler James Anderson tont Team India all rounder Ravindra Jadeja)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें