Mithali Raj : पंतप्रधानांकडून मिताली राजचं कौतुक, क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी काम करण्याचं दिलं आश्वासन

पंतप्रधानांनी पत्र लिहून कौतुक केल्यामुळं मिताली राज भारावून गेल्यात. हा माझ्यासाठी सन्मान आणि अभिमानाचा क्षण आहे. सन्माननीय पंतप्रधानांनी मला यातून प्रेरणा दिली आहे. यातून लाखो चाहत्यांनाही स्फूर्ती मिळेल, असं मला वाटतं. मी या पत्रानं भारावून गेली आहे. आभार कसं मानावेत, यासाठी माझ्याकडं शब्द नाहीत, असंही मिताली राज यांनी ट्वीट केलंय.

Mithali Raj : पंतप्रधानांकडून मिताली राजचं कौतुक, क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी काम करण्याचं दिलं आश्वासन
पंतप्रधानांकडून मिताली राजचं कौतुक
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 03, 2022 | 12:34 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची महिला क्रिकेटची माजी कर्णधार मिताली राजचं पत्र लिहून कौतुक (Appreciation) केलं. मोदी पत्रात लिहितात, तुम्ही काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली. यामुळं तुमचे चाहते निराश झालेत. तुमच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल तुमचं अभिनंदन. दोन दशक तुम्ही क्रिकेटसाठी अर्पित केलीत. तुमच्याकडं ते टॅलेंट होतं. तुमच्याकडं असलेला उत्साह नवीन खेळाडूंना स्फूर्ती देत राहील. दोन दशकांच्या कालावधीत तुम्ही काही रेकॉर्ड (Record) निर्माण केलेत. जगात महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुमचं नाव टॉपमध्ये घेतलं जातंय. ते तुमच्याकडं असलेल्या क्षमतेमुळं. तुम्ही चांगल्या अॅथलेटसुद्धा आहात. क्रिकेटमधील शेकडो महिला तुमच्याकडं आशेनं पाहतात. तुम्ही त्यांच्यासाठी रोल मॉडल आहात. या पत्रावर मिताली राज यांनी ट्वीट केलंय. क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी काम करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदी यांना दिलं.


मोदींनी करून दिली 2017 च्या वर्ल्ड कप फायनलची आठवण

मोदी पत्रात म्हणतात, तुमच्या खिलाडी वृत्तीचं जागतिक स्तरावर कौतुक केलं जातंय. तुमच्याकडं उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य आहे. मी 2017 चा वर्ल्ड कपचा फायनल सामना विसरू शकत नाही. त्यावेळी भारत विजयाच्या उंबरठ्यावर होता. तेव्हा तुम्ही शांत होतात. कोविडच्या काळातही तुम्ही लोकांना सेवा प्रदान केली. सोशल मीडियातून तुम्ही सेवानिवृत्तीची घोषणा केली. भारतीय क्रीडा विश्वात तुमचं योगदान खूप मोठं आहे. मला आशा आहे की, तुम्ही क्रीडा क्षेत्राला नेहमी मदत करालं. तुमच्या दुसऱ्या इनिंगसाठी बेस्ट लक. – नरेंद्र मोदी

मिताली राजची प्रतिक्रिया काय

पंतप्रधानांनी पत्र लिहून कौतुक केल्यामुळं मिताली राज भारावून गेल्यात. हा माझ्यासाठी सन्मान आणि अभिमानाचा क्षण आहे. सन्माननीय पंतप्रधानांनी मला यातून प्रेरणा दिली आहे. यातून लाखो चाहत्यांनाही स्फूर्ती मिळेल, असं मला वाटतं. मी या पत्रानं भारावून गेली आहे. आभार कसं मानावेत, यासाठी माझ्याकडं शब्द नाहीत, असंही मिताली राज यांनी ट्वीट केलंय. दरम्यान, अनिल कपूर, करण जोहर, रंगनाथन माधवन, अनुपम खेर, ठाकूर अरुण सिंग यांनीही मिताली राजवर कौतुकाचा वर्षाव केला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें