सामन्यानंतरचा गाैतम गंभीर याचा ड्रेसिंग रूममधील तो धक्कादायक फोटो व्हायरल, थेट..

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर याच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. कसोटी मालिकेत लाजीरवाणा पराभव भारतीय संघाचा झाला. यादरम्यानच आता गाैतम गंभीरचा एक हैराण करणारा फोटो व्हायरल होत आहे.

सामन्यानंतरचा गाैतम गंभीर याचा ड्रेसिंग रूममधील तो धक्कादायक फोटो व्हायरल, थेट..
Gautam Gambhir
| Updated on: Nov 27, 2025 | 8:51 AM

भारतीय कसोटी क्रिकेट संघाला इतिहासातील सर्वात वाईट पराभवाला स्वत:च्या मैदानात सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममधील दुसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी 408 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 549 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारताला तितक्या धावा करण्यात अपयश आले आणि भारतीय संघाचा 408 धावांनी पराभव झाला. हा पराभव भारतीय प्रेक्षकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. हेच नाही तर भर स्टेडियमवर प्रेक्षकांनी भारतीय संघाविरोधात आणि मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर याच्या विरोधात घोषणाबाजी केली. भारताला ऋषभ पंत याच्या नेतृत्वात या पराभवाचा सामना करावा लागला आहे. कसोटी सामन्याच्या अगोदरपासून गाैतम गंभीरवर टीका केली जात आहे. खेळापेक्षा गाैतम गंभीरचे खेळपट्टीवर अधिक लक्ष असल्याचे सांगितले जात होते.

भारतीय क्रिकेटसंघाच्या हातातून कसोटी गेल्यानंतर आता गाैतम गंभीरवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यानच गंभीरचा एक फोटो व्हायरल होत आहे आणि या फोटोमध्ये पराभवानंतर तो रडत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या फोटोमध्ये गाैतम गंभीरचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. गाैतम गंभीरचा चेहरा बघितला तर त्याच्या चेहऱ्यावर रडण्याचे भाव दिसत आहेत.

गाैतम गंभीरचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये गाैतम गंभीर हा ड्रेसिंग रूममध्ये दिसत असून त्याचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय. घरच्या मैदानात भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. यादरम्यान प्रत्येक स्तरातून टीका होत आहे. हेच नाही तर अनेकांनी थेट गाैतम गंभीरच्या राजीनाम्याची मागणी केली. अनेक सामने भारतीय संघाने जिंकूनही रोहित शर्माला कर्णधारच्या पदावरून काढल्यापासून गाैतम गंभीर टीकेचा धनी ठरतोय.

गुवाहाटीच्या कसोटी सामन्या अगोदर गाैतम गंभीर कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचला होता. ही कसोटी बरोबरीने राखणे मोठे आव्हान भारतीय संघासमोर होते. मात्र, भारताला या कसोटीमध्ये अजिबातच यश मिळाले नाही. त्यामध्येच कसोटीतील पराभवानंतर गाैतम गंभीरचा फोटो व्हायरल होत आहे.