Shreyas Iyer Injury Update : दुखापतीनंतर श्रेयस अय्यरची पहिली पोस्ट, दिली मोठी अपडेट

भारतीय क्रिकेट संघातील नामवंत खेळाडू श्रेयस अय्यर सध्या बराच चर्चेत आहे. दुखापतीमुळे सध्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या श्रेयसच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreyas Iyer Injury Update : दुखापतीनंतर श्रेयस अय्यरची पहिली पोस्ट, दिली मोठी अपडेट
श्रेयस अय्यर हेल्थ अपडेट्स
| Updated on: Oct 30, 2025 | 12:08 PM

Shreyas Iyer latest Injury Update : भारतीय क्रिकेट संघातील नामवंत खेळाडू श्रेयस अय्यर सध्या बराच चर्चेत आहे. दुखापतीमुळे सध्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या श्रेयसच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द श्रेयसनेच त्याच्या दुखापतीबद्दल, तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. श्रेयसने रुग्णालयातील बेडवरूनच, त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे, त्याची ही पहिली परोस्ट पाहून चाहत्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. तो लवकरच मैदानावर परतेल असा चाहत्यांना विश्वास आहे.

सिडनी वनडे मध्ये झाली दुखापत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. तेव्हापासूनच तो रुग्णालयात दाखल आहे. सिडनी एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 34 व्या षटकात ॲलेक्स कॅरीचा झेल पकडण्याचा प्रयत्न करताना अय्यरला दुखापत झाली. अय्यरने तो कॅच तर टिपला पण तो तो स्वतः जखमी झाला.

श्रेयसची पहिली पोस्ट काय ?

या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे श्रेयस अय्यरला दोन ते तीन दिवस आयसीयूमध्ये घालवावे लागले. मात्र आता तो आयसीयूमधून बाहेर असून त्याने सोशल मीडियावरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवरूनच प्रकृतीबद्दल अपडेट्स दिले आहेत.

चाहत्यांचे मानले आभार

मी सध्या रिकव्हर होत आहे, आणि दररोज माझी प्रकृती आधीपेक्षा जास्त सुधारत आहे. मला मिळालेल्या सर्व शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्या खूप महत्वाच्या आहेत.  तुम्ही माझ्यासाठी केलेल्या या प्रार्थनेबद्दल मी मनापासून आभारी आहे असं म्हणत श्रेयस अय्यरने त्याच्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

या पोस्टमुळे श्रेयसच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मैदानावर वापसी कधी ?

दुखापतीने ग्रस्त असलेला श्रेयस अय्यर सध्या बरा होत असला तरी तो खेळाच्या मैदानावर परत कधी येईल, यासंदर्बात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आणखी 2 महीने तरी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहील. याचाच अर्थ असा की या वर्षी खेळवण्यात येणाऱ्या कोणत्याही सीरिजमध्ये श्रेयस खेळण्याची शक्यता कमी आहे. तो हॉस्पिटलमध्ये आणखी किती दिवस राहील, याबद्दलही माहिती मिळालेली नाही. पण संपूर्ण रिकव्हरी झाल्यानंतरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल हे नक्की.